भारताप्रमाणे सगळ्याच देशातल्या स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी करतात. नोकरी करताना वर्क आणि लाइफ यांचा तोल योग्य प्रकारे सांभाळला गेला तर तो देश महिलांसाठी नोकरी करायला चांगला असतो. असे 10 देश आहेत जिथे महिला आनंदानं नोकरी करू शकतात.
महिलांसाठी नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम देश आहे डेन्मार्क. इथे वर्क आणि लाइफचा मेळ चांगला साधला जातो.महिलांना नोकरीत भरपूर सवलतीही मिळतात.
माल्टा हा देशही स्त्रीसाठी नोकरी करण्यास उत्तम आहे. इथे नोकरीत वातावरण चांगलं असतं. 58 टक्के महिला आणि 48 टक्के पुरुष इथे नोकरी करतात.
आॅस्ट्रेलियातही महिला दडपणाशिवाय नोकरी करू शकतात. तिथे स्त्रियांचं नोकरी करण्याचं प्रमाण 70 टक्के आहे.