चेन्नई, 17 जून : भारत-चीन यांच्या झालेल्या संघर्षात भारताचे 24 जवान शहीद झाले तर 80 हून अधिक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. 45 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनमध्ये आक्रमक चकमक झाली. दरम्यान, या घटनेबाबत वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी आयपीएल टीम चेन्नई सुपरकिंग्जच्या (Chennai Super Kings) अडचणी वाढल्या आहेत. CSK संघाचे टीम डॉक्टर मधू थोट्टाप्पिल्लिल (Dr. Madhu Thottappillil) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मधू यांनी लडाखमध्ये 24 जवान शहीद झाल्यानंतर त्याच्याबाबत वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “मी जाणून घेण्यास उत्सुक आहे की, शहीद जवानांच्या शवपेटीवर ‘पीएम केअर’चे स्टीकर लावले असेल का”. दरम्यान त्यांनी या ट्वीमध्ये भारतीय सैनिकांचे नाव घेतले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. या वादानंतर मधू यांनी आपले ट्विटरवर अकाउंट लॉक केले. वाचा- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक
या ट्विटवरून CSK संघाकडे युझरनं तक्रार केली. त्यानंतर CSK संघानं एक पत्रक जारी केले. यात त्यांनी, “CSK संघाचे टीम डॉक्टर मधू थोट्टाप्पिल्लिल यांना आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्याचे सांगितले”. वाचा- भारत-चीन सीमेवरील संघर्ष: हिंसेदरम्यान चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू
45 वर्षांनंतरचा सर्वात मोठा हल्ला भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात भारतीय सैन्यातील 23 जवान शहीद झाले आहेत तर चीनच्याही अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. वाचा- चीननं भारताचा कसा केला विश्वासघात? जवानांनी सांगितली गलवान खोऱ्यातली कहाणी संपादन-प्रियांका गावडे.