JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनामुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन करण्याची गरज आहे का? ICMR ने केला मोठा खुलासा

कोरोनामुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन करण्याची गरज आहे का? ICMR ने केला मोठा खुलासा

कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या प्रकरणात फॉरेन्सिक शवविच्छेदनासारखे आक्रमक तंत्र अवलंबले जाणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 मे: कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाच पोस्टमार्टम अर्थात शवविच्छेदन करण्याची गरज आहे काय, याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मोठा खुलासा केला आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या प्रकरणात फॉरेन्सिक शवविच्छेदनासारखे आक्रमक तंत्र अवलंबले जाणार नाही., असा ICMR ने निर्णय घेतला आहे. कारण जास्त मेहनतीनंतरही आरोग्य कर्मचार्‍यांना शवाच्या अवयव द्रव आणि स्रावमुळे कोरोनाबाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्यकीय चिकित्सकाने प्रमाणपत्र दिले असेल तर शवविच्छेदन करण्याची गरज नसल्याचं ICMR ने स्पष्ट केलं आहे. हेही वाचा.. जितेंद्र आव्हाडांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले ‘हिच ती वेळ’ डॉक्टर, शवगृह कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि शवविच्छेदन कोरोना साखळीत सामील असलेल्या सर्वांना संक्रमणाचा प्रसार रोखता येईल. जर रुग्णालयात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारे मृत्यू हे वैद्यकीय सेवेखाली एमएलसी प्रकरण असल्यामुळे पोस्टमॉर्टमची आवश्यकता नसते. फक्त उपचार करीत असलेल्या डॉक्टरांकडून मृत्यूचे आवश्यक प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे, असं आयसीएमआरने आपल्या ‘कोविड 19 डेथ् इन मेडिको-लीगल ऑटॉप्सी फॉर मेडिको-लीगल ऑटॉप्सी फॉर स्टँडर्ड दिशानिर्देश’मध्ये म्हटलं आहे. रुग्णालयात आणलेल्या कोविड 19 संशयित रूग्णांच्या शवविच्छेदनास आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांनी मेडिको कायदेशीर प्रकरण, असे लेबल दिले जाऊ शकते. हा मृतदेह शवगृहात पाठवला जाईल आणि पोलिसांना कळवले जाईल. जे मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्याची आवश्यकता भासू शकते. या प्रकरणांच्या न्यायवैद्यकीय शवविच्छेदनामध्ये सूट देखील दिली जाऊ शकते, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. हेही वाचा… ‘नवरी नटली’ फेम आणि प्रसिद्ध लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन मृतक कोविड 19 संक्रमित किंवा संशयित असल्यास, खून, अपघाती निधन किंवा आत्महत्या यासारख्या काही घटनांमध्ये जर एखाद्या रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाला तर वैद्यकीय नोंदी आणि इतर सर्व संबंधित कागदपत्रे फॉरेन्सिक शवविच्छेदनासाठी पाठवली जाऊ शकतात, असंही ICMR ने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या