पठाणकोट 16 एप्रिल: भारतीय हवाईदलाच्या शक्तिशाली अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टरचं आज इमर्जन्सी लँडिंग झालं. पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या हवाईदलाच्या तळावरून या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. पाकिस्तान सीमेवजवळचा हा भाग संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. सुदैवाने पायलटने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर सुरक्षितपणे एका शेतात उतरवलं. दोनही पायलट सुखरूप आहेत. दररोजच्या सरावासाठी या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्यात तांत्रिक अडचण आली. कंट्रोल रुमने त्याबाबत निर्देश देताच पायलटने हेलिकॉप्टर सुरक्षीत उतरवलं. त्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी पायलटला बाहेर निघण्यास मदत केली. हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हेलिकॉप्टरची तपासणी करून नंतर ते हेलिकॉप्टर तळावर आणण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितलं. 2015मध्ये याबाबत अमेरिका आणि भारतात करार झाला होता. अशी एकूण 22 चॉपर्स भारताला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय वायुदलाची शक्ती आता वाढणार आहे. याला ‘मल्टी रोल काँबॅट हेलिकॉप्टर’ असंही म्हणतात आणि या श्रेणीतलं हे जगातलं सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. अमेरिकन लष्कर आणि वायुदलही याचा भरपूर वापर करतात. लॉकडाऊनमध्ये तुमची नोकरी गेली किंवा पगार कापला तर थेट पंतप्रधान घेणार आढावा जेव्हा जगातील सर्वात धोकादायक हल्ल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचा प्रश्न येतो तेव्हा अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे नाव सर्वात आधी येतं. आक्रमकपणे हल्ला करणारं हे हेलिकॉप्टर तीन दशकांहून अधिक काळातील MI 35 हेलिकॉप्टरची जागा घेतली आहे. पहिल्या अपाचे स्क्वॉडर्नचं नेतृत्व ग्रुप कॅप्टन एम शयलूच्या यांच्याकडे आहे.
यापूर्वी ते कार निकोबार इथल्या MI-17 V5 हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. ज्यांनी अपाचे हेलिकॉप्टरवर सखोल प्रशिक्षण घेतलं आहे. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे शत्रूच्या घरात घुसण्याची भारताची क्षमता आणखी वाढली आहे. काय आहे विशेष…! - हल्ल्याचं कोणतंही हेलिकॉप्टर शक्तीशाली असतं. त्यामध्ये शस्त्रे असतात. टू सीटर अपाचे अॅटॅक हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर क्षेपणास्त्र आणि प्रत्येक बाजूला दोन 30 मिमी बंदुका आहेत. - या हेलिकॉप्टरची खास गोष्ट म्हणजे दिवसाप्रमाणे रात्रीच्या वेळीदेखील आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकतं.
- या हेलिकॉप्टरसमोर एक सेन्सर बसवण्यात आला आहे. जो रात्री ऑपरेशन करण्यास मदत करेल. - अपाचे प्रति तास 365 किमी वेगाने उड्डाण करू शकतं आणि शत्रूच्या घरात जाऊन सहजपणे नष्ट करू शकतो. - अपाचे हेलिकॉप्टरमध्ये काही वैशिष्ट्यं आहेत जी हल्ल्याच्या उर्वरित हेलिकॉप्टरपेक्षा वेगळी आहेत. यात त्याचे हेल्मेट माउंटेड डिस्प्ले सर्वात महत्वाचा आहे. ज्याच्या मदतीने हेलिकॉप्टरमधला पायलट सहजपणे शत्रूला लक्ष्य बनवू शकतो.