

शुक्रवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumarswamy) यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी (Nikhil Kumarswamy)चा विवाहसोहळा पार पडला. लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवत हा सोहळा आयोजित केल्याचा आरोप केला जात आहे.


निखिलचं लग्न कर्नाटकमधील काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री एम कृष्णप्पा यांची नात रेवती हिच्याबरोबर झालं. निखिलचे आजोबा म्हणजेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा देखील यावेळी उपस्थित होते.


निखिल आणि रेवतीचा विवाहसोहळा रामनगरमधील एका फार्महाऊसवर पार पडला. देशातील लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यासाठी या सोहळ्यासाठी केवळ 21 गाड्यांना परवानगी देण्यात आली होती


कुमारस्वामी यांनी दावा केला होता की, या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.


यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करताना, आलेल्या पाहुण्यांना सोहळा पाहता यावा याकरता मोठ्या टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.


दरम्यान कर्नाटकमधील बीएस येडीयुरप्पा सरकारमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन न केल्यास योग्य कारवाई करण्यात येणार आहे.