JOIN US
मराठी बातम्या / देश / गलवान खोऱ्यात किती चिनी सैनिकांचा झाला मृत्यू? सरकार गप्प; कुटुंबीय संतापले

गलवान खोऱ्यात किती चिनी सैनिकांचा झाला मृत्यू? सरकार गप्प; कुटुंबीय संतापले

चिनी कम्युनिस्ट सरकारच्या निर्णयामुळे सैनिकांचे नातेवाईक खूप नाराज आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 28 जून : गलवान खोऱ्यातील चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीनंतर चीनला स्वत:च्या राज्यातून प्रश्न विचारला जात आहे.  अमेरिकेतील माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चिनी कम्युनिस्ट सरकारच्या निर्णयामुळे सैनिकांचे नातेवाईक खूप नाराज आहेत. अहवालानुसार या घटनेत ठार झालेल्या अनेक सैनिकांची नावे चीनने अद्याप उघड केलेली नाहीत. चीनमधील लोक आणि विशेषत: सैनिकांच्या कुटुंबीयांमध्ये याविषयी बरीच नाराजी दिसून येत आहे हे उघड आहे. सैनिकांचे कुटुंब सोशल मीडियावर चीनच्या कम्युनिस्ट पार्टी सरकारला सैनिकांविषयी सतत प्रश्न विचारत आहे आणि त्याचे उत्तर देणे सरकारला अवघड जात आहे. मृत्यू झालेल्या सैनिकांबाबत जनतेकडून विचारला जातोय सवाल हे वाचा- मुजोर चीनी सैनिक हटायला तयार नाहीत, सीमेवरचा वाद चिघळण्याची चिन्हे यूएस ब्रेइटबार्ट न्यूजच्या अहवालानुसार गलवान खोऱ्यात चिनी सैनिक मारल्यानंतर अनेक सैनिकांच्या कुटुंबीयांनी चीनच्या सोशल मीडिया साइट्स वीबो व इतरांवर शी जिनपिंग यांच्या सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. भूतकाळात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सैनिकांची नावे सांगण्यासाठी ते सरकारकडे सतत विचारणा करीत आहेत. हे वाचा- चिनी सैनिकांची आता काही खैर नाही! पूर्व लडाखमध्ये तोडीस तोड देणारी यंत्रणा तैनात 40 हून अधिक चिनी सैनिक मारले गेले 15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले. याशिवाय चीनमधील 40 हून अधिक सैनिकही ठार झाले, परंतु अद्याप चीन सरकारने ते स्वीकारले नाही. चीनने काही कमांडरांचा मृत्यू झाल्याची बाब स्वीकारली आहे. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या