चिनी सैनिकांची आता काही खैर नाही! पूर्व लडाखमध्ये तोडीस तोड देणारी यंत्रणा तैनात

चिनी सैनिकांची आता काही खैर नाही! पूर्व लडाखमध्ये तोडीस तोड देणारी यंत्रणा तैनात

भारत-चीन तणावात 20 जवानांना वीरमरण आलं. चीनविरोधात सुरू असलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने कंबर कसली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून : भारत चीनमधील वाढता सीमा विवाद लक्षात घेता लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे दोन दिवस लडाखमध्ये होते. लडाखच्या भेटीनंतर दुसर्‍याच दिवशी भारतीय सशस्त्र दलांनी नियंत्रण रेषेच्या (LAC) बाजूने चिनी लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरच्या वाढत्या फेऱ्य़ांच्या दरम्यान हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा  (Air defense missile system) सुरू केली आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाख सेक्टरमध्ये सुरू असलेल्या बिल्ड-अपचा एक भाग म्हणून भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दल दोघांच्या वायू रक्षा प्रणालींना चिनी सैनांच्या लढाऊ जेट किंवा पिपल्स लिबरेशन आर्मीच्या हेलिकॉप्टरद्वारे कोणत्याही कारवाईला रोखण्यासाठी लडाखमध्ये ही प्रणाली तैनात करण्यात आली आहे.

हे वाचा-फक्त आधार क्रमांकाने करु शकता स्वत:च्या कंपनीची नोंदणी; नियमांमध्ये मोठा बदल

गेल्या काही आठवड्यांत, चिनी सैन्याच्या सुखोई -30 सारखी विमाने भारतीय सीमेपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उड्डाण करताना दिसत आहेत. सुत्रांनी सांगितले की, लवकरच भारताला एलएसीवर तैनात करता येणारी एक अत्यंत सक्षम हवाई संरक्षण प्रणाली मिळणार आहे. एलएसीवर या विमाने तैनात करणे म्हणजे संपूर्ण परिसराची काळजी घेणे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान चीनच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाने (Indian Air force) लेह-लडाखमध्ये (leh-Ladakh) संयुक्त युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. याच भागात चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने लष्कराने हा निर्णय घेतला आहे. या युद्धाभ्यासात सुखोई 30MKI, चिनूक MI 17, या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला. त्यात मालवाहू विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टरही सहभागी झाले होते. या भागातली भौगोलि परिस्थिती पाहता लष्कराला खास काळजी घ्यावी लागते त्याचाही सराव करणे सुरू आहे.

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 27, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या