मुजोर चीनी सैनिक हटायला तयार नाहीत, सीमेवरचा वाद चिघळण्याची चिन्हे

मुजोर चीनी सैनिक हटायला तयार नाहीत, सीमेवरचा वाद चिघळण्याची चिन्हे

चीनच्या दुप्पटीपणाचा भारत सरकारला चांगला अनुभव आहे त्यामुळे जो पर्यंत चीन आपले सैन्य मागे घेणार नाही तोपर्यंत भारत देखील आपले सैन्य मागे घेणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 27 जून : लडाखमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारत आणि चीन () या दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्याचे मान्य केले असूनही मैदान दिसत नाही. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार, LACवरची परिस्थिती तशीच आहे. चीनकडून माघार घेण्याच्या प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. गलवान खोऱ्यात  रक्तरंजित संघर्षानंतर 22 जून रोजी निर्णय घेण्यात आला होता की  सहा जून रोजी झालेल्या करारानुसार दोन्ही सैन्याने माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर खालच्या पातळीवर झालेल्या बैठकीत त्याची यंत्रणादेखील निश्चित करण्यात आली, परंतु चीनकडून याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार LACवर 22 जूनपूर्वीची परिस्थिती कायम आहे.

चीनमधील भारतीय राजदूतांनी स्पष्ट केले की  चीनचे सीमेवरचे बांधकाम थांबवले तरच एलएसीवर ताणतणाव संपेल. दोन्ही बाजूंनी सध्या सैन्य जमा आहे. चीनने आपले सैन्य वाढवले होते त्याच प्रमाणात भारतानेही आपले सैन्य वाढवले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूचे हवाई दलही उच्च सतर्कतेवर आहेत. चिनी सैन्याच्या जमावबंदीला उत्तर देताना त्याने आपली तयारी केली असल्याचे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रथम दोन्ही बाजूंनी आपल्या सैन्यांची संख्या हळूहळू कमी करावी लागेल. यानंतर, नवीन कायम किंवा तात्पुरती रचना तयार केल्या गेल्या आहेत, त्या रिकाम्या कराव्या लागतील. या प्रक्रियेस कित्येक आठवडे ते महिने लागू शकतात.

डोंगरावर भारत  तयार आहे तर अमेरिकेने समुद्राला वेढले त्यामुळे आता चीनचा घाम फुटला आहे.

चीन वादावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राहुल गांधींपेक्षा घेतली वेगळी भूमिका

हे स्पष्ट आहे की हा संघर्ष डोकलामपेक्षा जास्त  दिवसांपर्यंत वाढू शकतो. जिथे चिनी सैन्य 72 दिवसांनी मागे घेण्यात आले होते. सूत्रांनी सांगितले की एलएसीवरील प्रगती फक्त इतकीच आहे की 22 जूननंतर दोन्ही बाजूंकडून संघर्ष वाढविण्यासाठी कोणतीही नवीन कारवाई झालेली नाही.

चीनच्या मुजोरीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

चीनच्या दुप्पटीपणाचा भारत सरकारला चांगला अनुभव आहे त्यामुळे जो पर्यंत चीन आपले सैन्य मागे घेणार नाही तोपर्यंत भारत देखील आपले सैन्य मागे घेणार नाही. दरम्यान काही भागात चिनी सैन्य  बंकर बनवीत असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे भारतीय लष्कर जास्त सतर्क आहे.

First published: June 27, 2020, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading