चंदिगड, 5 ऑगस्ट : माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मामानंच भाचीवर बलात्कार केल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे. घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत कंस मामानं आपल्या भाचीवर अत्याचार केला आणि तो फरार झाला. इतकंच नाही तर घडलेला प्रकार कोणालाही सांगू नको, नाही तर जीवे ठार करेन, अशी धमकीही त्यानं पीडित मुलीला दिली होती. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पीडितेनं तिची आपबीती कुटुंबीयांना सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी थेट पोलिसात धाव घेतली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हरियाणातील सोनीपत येथील धक्कादायक घटना आहे. मामानं भाचीवर केला बलात्कार मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपतच्या कुंडली पोलीस स्टेशन परिसरात एका युवकानं आपल्याच भाचीवर बलात्कार केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी सध्या फरार आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पीडितेच्या निवासस्थानी वास्तव्यास होता. (वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रीने पतीवर केला अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा आरोप ) घरात कोणीही नसल्याचा घेतला गैरफायदा पीडित मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीनं हे कुकृत्य केलं आहे. यानंतर त्यानं पीडितेला जीवे मारण्याचीही धमकी दिली आणि तो फरार झाला होता. पण कुटुंबीय घरी परतल्यानंतर तिनं सर्व प्रकार त्यांना सांगितला. (वाचा : आई बाहेर गेलेली, भाऊ झोपलेला..नराधमाने घरात घुसून केला मुलीवर बलात्कार ) पीडितेची पोलिसात तक्रार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी ठिकठिकाणी त्याचा शोधदेखील घेतला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी अहवालातून तिच्यावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. (वाचा : म्हाताऱ्यासोबत लग्नास नकार देणाऱ्या मुलीला बापाने केली अमानुष मारहाण ) भारतीय जवानांनी पाकचे दात घशात घातले, दहशतवाद्यांसह बॅटच्या 7 कमांडोंचा खात्मा