आई बाहेर गेलेली, भाऊ झोपलेला..नराधमाने घरात घुसून केला मुलीवर बलात्कार

आई बाहेर गेलेली, भाऊ झोपलेला..नराधमाने घरात घुसून केला मुलीवर बलात्कार

अज्ञात नराधमाने घरात घुसून एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार परिसरात मंगळवारी (30 जुलै) रात्री 9.45 ते 10.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट- अज्ञात नराधमाने घरात घुसून एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार परिसरात मंगळवारी (30 जुलै) रात्री 9.45 ते 10.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मुलीची आई काही कामासाठी बाहेर गेली होती तर तिचा धाकटा भाऊ दुसऱ्या खोलीत झोपला होता. याचा फायदा घेऊन अज्ञात नराधम घरात घुसला आणि त्याने मुलीला किचनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यानंतर मुलीने आपबिती सांगितली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुसळधार पावसामुळे काही समजलेच नाही...

शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, मंगळवारी मुसळधार पाऊस होता. त्यामुळे तिच्या ओरडण्याचा आवाज आला नाही. पावसामुळे शेजारी राहाणारे लोक आपापल्या घरात होते. पीडितेच्या ओळखीतील व्यक्तीचे हे काम असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलीची आई भाजीपाला विक्रीचे काम करते तर वडील रिक्षाचालक आहे.

मुंबईत कॉलेज तरुणीला दूधवाल्याचा 'नकोसा' स्पर्श

मुंबईत कॉलेज तरुणीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दूधविक्रेता असल्याचे समजते. मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. नबी हुसेन शेख (वय-26,रा.कांदिवली) असे आरोपीचे नाव आहे.

नकोसा स्पर्श करुन पळाला होता आरोपी...

मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ 23 जुलै रोजी ही घटना घडली आहे. पीडित तरुणी कॉलेजबाहेर मैत्रिणीसोबत बोलत उभी होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिला नकोसा स्पर्श करुन पळून गेला. नंतर तरुणीने मालाड पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. ही घटना कॉलेज बाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी फुटेजच्या मदतीने घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आतच आरोपीला गजाआड केले. नबी शेख हा भागातील एका तबेल्यात काम करतो.

आरोपीचे अनेक किळसवाणे प्रकार उघडकीस...

आरोपी नबी शेखने यापूर्वी अनेक तरुणींसोबत असा विकृत आणि किळसवाणा प्रकार केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. नबी शेखवर अशा प्रकारचे असे किती गुन्हे दाखल आहेत का, त्याच्या या विकृतपणाला मुली बळी पडल्या आहेत, याबाबत पोलिस तपास करत आहेत. नबी शेखला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमित शहांचा उदयनराजेंना फोन, संपूर्ण कॉल रेकॉर्डचा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 2, 2019, 7:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading