या बॉलिवूड अभिनेत्रीने पतीवर केला अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा आरोप

या बॉलिवूड अभिनेत्रीने पतीवर केला अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा आरोप

मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी तिने मिस इंडियाचा किताबही आपल्या नावावर केला होता. याशिवाय तिने अनेक पुरस्कार सोहळ्यांचं सूत्रसंचालन केलं.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात हिट जोडी अक्षरा सिंह आणि पवन सिंह यांच्यातला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. मुंबईतील मालाड येथील मालवणी पोलीस ठाण्यात अक्षराने पवनविरोधात धमकावल्याची तक्रार नोंदवली. याआधी बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री युक्ता मुखीनेही नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मिस वर्ल्डचा किताब जिंकलेल्या युक्ताने पती प्रिन्स टुलीवर अनेक गंभीर आरोप केले. आरोपात युक्ताने म्हटलं की, प्रिन्स तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवायचा. यासोबत पोलिसांनी सांगितलं की, युक्ताने नवऱ्यावर मारपीट, अनैसर्गिक संबंध आणि हुंडा मागणे यांसारखे आरोप केले होते. युक्ताच्या नवऱ्याने या सर्व आरोपांचं खंडण केलं होतं. अखेर हे प्रकरण न्यायालयात जाऊन दोघांचा घटस्फोट झाला.

2000 मध्ये युक्ताने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. यानंतर तिने सिनेसृष्टीत आपलं करिअर करण्याचा विचार केला. बॉलिवूडमध्ये तिला जम बसवता न आल्यामुळे तिने आपला मोर्चा भोजपुरीकडे वळवला. तिने 'पूवेलम' या तमिळ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 2002 मध्ये 'प्यासा' नावाचा एक हिंदी सिनेमाही केला. याशिवाय ती 'उन्होंने कब हकबा तू आईलव यू' या सिनेमात ती दिसली होती.

मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी युक्ता मुखीने मिस इंडियाचा किताबही आपल्या नावावर केला होता. याशिवाय तिने अनेक पुरस्कार सोहळ्यांचं सूत्रसंचालन केलं. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर आहे.

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 3, 2019, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading