JOIN US
मराठी बातम्या / देश / अहो आश्चर्य! या मंदिरात चक्क नंदीची मूर्ती पिते दूध, मूर्तीला दूध पाजण्यासाठी नागरिकांची झुंबड

अहो आश्चर्य! या मंदिरात चक्क नंदीची मूर्ती पिते दूध, मूर्तीला दूध पाजण्यासाठी नागरिकांची झुंबड

उत्तरप्रदेशच्या एका शिव मंदिरातील नंदीची मूर्ती पाणी आणि दूध पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

अहो आश्चर्य! या मंदिरात चक्क नंदीची मूर्ती पिते दूध

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरदोई, 9 जुलै : उत्तप्रदेशच्या हरदोई येथील पाली क्षेत्रामधील शिव मंदिरात दूध पिणाऱ्या नंदीच्या मूर्तीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये अनेक भाविक नंदीच्या मूर्तीला चमच्याने दूध पाजत असल्याचे पाहायला मिळते. नंदीची मूर्ती दूध पीत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांमध्ये याविषयी विविध चर्चा रंगत आहेत. हरदोई मुख्यालयापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली येथील ही घटना आहे. येथील शिवमंदिरात भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. परंतु यावेळी जेव्हा काही लोक भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीच्या मूर्तीला जल अर्पण करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी ते जल नंदीची मूर्ती पित असल्याचे लक्षात आले. याघटनेनंतर ही बातमी वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली. यानंतर भाविक मोठ्या प्रमाणावर मंदिराला भेट देऊन नंदीसाठी दूध आणू लागले. जिथे काही लोक या घटनेला चमत्कार म्हणता आहेत, तर दुसरीकडे काही लोक याला अंधश्रद्धेचं नाव देत आहेत.

हरदोईमध्ये नंदी दूध पिताना व्हायरल झालेल्या व्हिडिओला बागवान भोलेनाथ यांची कृपा मानत आहेत. हिंदू धर्मीय लोक पवित्र श्रावण महिन्यात अशी घटना घडणे हा एक चमत्कार मानतात. नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या आरतीनंतर लोकांनी नंदीला चरणामृत अर्पण केले, तेव्हा नंदीच्या मूर्तीने ते प्यायल्याचे दिसून आले. यानंतर येथे शेकडो लोकांची गर्दी झाली आणि लोकांनी घरातून दूध आणून मुर्तीला पाजण्यास सुरुवात केली. नंदीची मूर्ती दूध पितानाचा व्हिडीओ भक्तांनी  बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ज्योती मौर्यच्या केसमध्ये मोठा ट्विस्ट, पतीने केला आणखी एक गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अलीगढ आणि मध्य प्रदेशातील भिंडमध्येही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी शिवमंदिरात बसवलेली नंदीची मूर्ती दूध आणि पाणी पीत असल्याचा दावा केला होता. लोकांनी या दोन्ही ठिकाणांचे व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर शेअर केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या