जाहिरात
मराठी बातम्या / देश / ज्योती मौर्यच्या केसमध्ये मोठा ट्विस्ट, पतीने केला आणखी एक गौप्यस्फोट

ज्योती मौर्यच्या केसमध्ये मोठा ट्विस्ट, पतीने केला आणखी एक गौप्यस्फोट

ज्योती मौर्याच्या केसमध्ये मोठा ट्विस्ट, पतीने केला आणखी एक गौप्यस्फोट

ज्योती मौर्याच्या केसमध्ये मोठा ट्विस्ट, पतीने केला आणखी एक गौप्यस्फोट

पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि तिचा पती यांच्यातील वाद सध्या ट्रेंडमध्ये आहे. दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना ज्योतीच्या पतीने तिच्या शैक्षणिक पाश्ववभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रयागराज, 8 जुलै: सोशल मीडियावर सध्या पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि तिचा पती यांच्यातील वाद सध्या ट्रेंडमध्ये आहे. दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना ज्योतीच्या पतीने तिच्या शैक्षणिक पाश्ववभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी ज्योती मौर्य आणि तिच्या पतीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. ज्यात ज्योतीच्या नावासमोर अध्यापिका असे लिहिले होते. परंतु ही लग्नपत्रिका खोटी असल्याचा दावा ज्योतीचा पती आलोकने न्यूज 18 लोकल समोर केला. आलोक मौर्याने सांगितले की, " व्हायरल होत असलेली लग्नपत्रिका ही खोटी आहे. 2010 मध्ये जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा ज्योती ग्रेजुएशन करत होती ती कुठल्याही संस्थेत अध्यापक नव्हती. तेव्हा कोणी बीए केल्याशिवाय कस अध्यापक होऊ शकत. हे ज्योती आणि तिच्या वडिलांनी रचलेलं षडीयंत्र आहे. ज्योतीला विचारायला हवं की ती लग्न झालं तेव्हा बीए करत होती कि नव्हती आणि झाली होती तर ती कोणत्या ठिकाणी काम करत होती.

News18लोकमत
News18लोकमत

ज्योती मौर्यने धुमनगंज पोलीस ठाण्यात पती आलोकवर अनेक गंभीर आरोप करत केस केली आहे. पोलिसांनी ज्योतीची बाजू ऐकून घेतली असून तिचे स्टेटमेंट लिहून घेतले आहे तर आलोकचे स्टेटमेंट घेणं बाकी आहे. ज्योती मौर्यने पती आलोकवर आरोप लावले की पती आणि सासरची मंडळी फॉर्च्युनर कारची मागणी करीत होती, यासोबत ब्लॅकमेलिंगचे आरोप देखील लावण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात