Pune: Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar with party leader Praful Patel at the party's Halla Bol Yatra rally in Pune on Sunday, June 10, 2018. (PTI Photo) (PTI6_10_2018_000194B)
नवी दिल्ली 21 जून: गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकर सिंह वाघेला (Shankersinh Vaghela) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) आणि सरचिटणीस (National General Secretary पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना पत्र लिहून त्यांनी आपला निर्णय कळवला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या वाघेलांची मातब्बर नेते अशी ओळख आहे. त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला गुजरातमध्ये धक्का बसला आहे. पक्षांतर्गत मतभेदांना कंटाळून त्यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती आहे. गुजरात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी जयंत पटेल उर्फ बोस्की यांची नियुक्ती केल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. पक्षात आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. शरद पवार यांनी गांधीनगरमध्ये जाऊन वाघेलांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. आपल्या पक्षप्रवेशासाठी पवार गांधीनगरला आले होते याबद्दलही त्यांनी पवारांचे आभार मानले आहेत. आपल्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांमुळे तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे आणि हेच आपल्या राजीनाम्याचं मुख्य कारण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गुजरातचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले वाघेला हे कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू होते. आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पाच पक्षांमध्ये काम केलं आहे.
भाजपमध्ये राजीनामा देऊन त्यांनी स्वत:चा पक्ष काढला होता. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र कुठल्याच पक्षात ते फार काळ रमले नाहीत. 1996-97 या काळात ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. हेही वाचा - कारगिलचे हीरो LAC वर तैनात; भारतातील ही शक्तिशाली तुकडी चीनला शिकवणार धडा भारताला हानी पोहोचविण्यासाठी चीनचा नवा कट; आता या आवश्यक वस्तू होणार महाग