JOIN US
मराठी बातम्या / देश / गळ्यात हार घालणार तेच नवरदेवाला आला नवरीच्या बॅायफ्रेंडचा फोन, मेसेज पाहिला अन् वऱ्हाडासह ‘दुल्हेराजा’ परतला घरी

गळ्यात हार घालणार तेच नवरदेवाला आला नवरीच्या बॅायफ्रेंडचा फोन, मेसेज पाहिला अन् वऱ्हाडासह ‘दुल्हेराजा’ परतला घरी

एका लग्नसोहळ्यात गळ्यात हार घालणार तोच नवरदेवाला नवरीच्या बॅायफ्रेंडचा फोन आला. मेसेज पाहिला अन् वऱ्हाडासह दुल्हेराजा थेट घरी परतला.

जाहिरात

गळ्यात हार घालणार तेच नवरदेवाला आला नवरीच्या बॅायफ्रेंडचा फोन, मेसेज पाहिला अन् वऱ्हाडासह ‘दुल्हेराजा’ परतला घरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रहमान, प्रतिनिधी बस्ती, 1 जून : लग्नाची जय्यत तयारी झाली, नवरी भरजरी शालूत सजून तयार होती. तिला धुमधडाक्यात घेऊन जायला नवरा अगदी उतावीळ झाला होता. परंतु लग्नमंडपात हार घालताना नेमका नवऱ्याचा फोन वाजला आणि समोरून आवाज आला, ‘व्हॉट्सऍप चेक कर, ती माझी आहे.’ त्याने व्हॉट्सऍप पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरीचे काही खासगी फोटो समोर आले आणि हे लग्न मोडलं. तर, नवरीचे वडील थेट पोलीस स्थानकात पोहोचले आणि पोलिसांनी फोटो पाठवणाऱ्या मजनूच्या मुसक्या आवळल्या. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील शोहरतगडमध्ये ही घटना घडली. लग्नसोहळ्याची जय्यत तयारी मिळालेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. कुटुंबियांच्या संमतीने वधू-वर लग्नगाठ बांधण्यास तयार होते. लग्नात अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. संध्याकाळच्या सुमारास ठरलेल्या मुहूर्तावर नवरा मुलगा वरात घेऊन लग्नमंडपात हजर झाला. सुरुवातीला पाहुण्यांचं आदरातिथ्य झाल्यानंतर लग्न लागण्यापूर्वी वऱ्हाडी डीजेवर नाचू लागले. त्यानंतर अखेर मुहूर्ताची वेळ आली. एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यासाठी वधू-वर समोरासमोर उभे राहिले.

नवरीच्या बॉयफ्रेंडचा फोन वऱ्हाड्यांच्या नजरा त्या दोघांवरच खिळल्या होत्या. तितक्यात नवऱ्याचा फोन वाजला आणि समोरून एका इसमाने त्याला व्हॉट्सऍप पाहण्यास सांगितलं. शिवाय ‘तू ज्या मुलीशी लग्न करतो आहेस, ती फक्त माझी आहे’, अशी धमकीही देण्यात आली. त्यामुळे नवऱ्याने तातडीने व्हॉट्सऍप उघडून पाहिलं. तर, त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोचे एका परपुरुषासोबतचे खासगी फोटो दिसले. हे फोटो पाहून त्याला धक्काच बसला, नवरा रागाने लालबुंद झाला. मात्र वाद घालत बसण्यापेक्षा आपलं वऱ्हाड घेऊन शांततेत माघारी परतावं, हे त्याला योग्य वाटलं. वरात माघारी गेल्यानंतर लग्नमंडपात एक भयाण शांतता पसरली. मोठा भाऊ असा असतो का? लहान भावासोबत जे घडलं, ते पाहून पोलीस हादरले मंजनू अखेर अटकेत याप्रकरणी नवरीच्या वडिलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 मे रोजी जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर काही वेळातच पोलिसांनी फोटो पाठवणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आणि तुरुंगात टाकले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या