नवी दिल्ली 6 जुलै: भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुजोर चीनला वठणीवर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर लडाखचा दौरा करत जखमी सैनिकांची भेटही घेतली होती. आता केंद्र सरकार आणखी एक मोठो निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारतात गुंतवणूकीसाठी आलेल्या 50 चीनी कंपन्यांच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याची तयारी केंद्राने चालवली असून हा निर्णय झाला तर तो चीनला आणखी एक मोठा दणका असू शकतो. कोरोनाचं संकट आल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार भारताच्या शेजारच्या देशांना भारतात कुठेही गुंतवणूक करायची असल्यास त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं होतं. बड्या विदेशी कंपन्या भारतीय कंपन्यांची खरेदी करू नये हा त्यामागचा उद्देश होता. या बदल्यानंतर 50 चिनी कंपन्यांनी गुंतवणुकीचे प्रस्ताव दिले आहे. त्या सर्व प्रस्तावांचा फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा निर्णय घेतला गेला तर चिनी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या आधी सरकारने 59 चिनी Appsवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही मोठा फटका चीनला बसला आहे. त्याचबरोबर भारतात चिनी वस्तूंचा बहिष्कार करा अशी मोठी मोहिमच राबविण्यात येत आहे. त्यातच सरकारने आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्याने सरकार स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर जोर देत आहेत त्यामुळे चिनमधून होणारी आयातही घटण्याची शक्यता आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर चीन घाबरला! LAC वर 1.5 किमी मागे जाणार चिनी सैन्य पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लडाखमधील गलवान खोऱ्य़ातून चिनी सैन्याला मागे हटवण्यासाठी आपल्या सर्वात मजबूत राजनैतिक शस्त्राचा वापर केला आहे. केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांना पुढे ठेवले होते आणि रविवारी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे दोन तास चर्चा केली. भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण भारताच्या कठोर भूमिकेनंतर चीनकडे माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. चीनने अॅप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने ड्रॅगनला घेराव घातला यामुळे बीजिंग पूर्णपणे हादरले. या संभाषणात, गलवानमधील तणाव कमी करण्याचेही चीनने मान्य केले आहे.