भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण

भारत-चीन तणावाचा झोमॅटोला मोठा फटका; आकडा ऐकून व्हाल हैराण

भारत-चीन तणावादरम्यान भारतातील 59 अॅप्सवर बंदी आणली आहे

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : भारत-चीन तणावादरम्यान 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर मात्र अनेकांना मोठा फटका सहन करावा लागला. परिणामी भारतातील अनेक कंपन्या ज्यामध्ये चिनी गुंतवणूकदार आहेत, त्या कंपन्यांनाही मोठा फटका सहन करावा लागणार आहे,

यामध्ये झोमॅटो या कंपनीला मोठा फटका सहन करावा लागत आहे. या कंपनीत मोठ्या संख्येने चिनी गुंतवणुकदार आहेत. यादरम्यान झोमॅटोच्या अनेक कंपन्यांनी नोकरीवरुन राजीनामा दिल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्यातच मनी कंट्रोलच्या बातमीनुसार भारत-चीन तणावाचा झोमॅटोला 100 दशलक्ष डॉलरचा फटका बसला आहे. जानेवारी ही गुंतवणूक 150 मिलिअन डॉलर म्हणजेच 1065 कोटींपर्यंत पोहोचली होती. वर्ष 2018 मध्ये तर चिनी आस्थापना ‘अलिबाबा’शी संबंधित असलेल्या ‘अँट फायनान्शियल’ या आस्थापनाने ‘झोमॅटो’मध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे वृत्त समोर आले होते.

हे वाचा-पंतप्रधान मोदी यांनी सोडलं 'हे' चायनीज APP, दोन सोडून सगळ्या पोस्ट केल्या Delete

भारताच्या या कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक

स्विगी, झोमॅटो, बिग बास्केट, बायजू, फ्लिपकार्ट, हाईक, पॉलिसी बाजार यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे. एप्रिलमध्ये भारतीय सरकाराने परदेशी गुंतवणुकीसाठी पूर्व परवानगी घेण्यास सांगितले होते. यामध्ये भारताशी सीमेवर संलग्न असलेल्या देशांचा समावेश आहे. opportunistic takeovers रोखण्यासाठी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली होती.

चीन, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान या देशांना सीमेवरील सीमा असलेले देश आहेत. यामध्ये भारतातील एखाद्या कंपनीत सध्याच्या किंवा भविष्यातील (FDI) मालकीच्या कोणत्याही हस्तांतरणासाठी सरकारी मान्यता अनिवार्य असेल, असेही यात म्हटले आहे.

 

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: July 5, 2020, 6:46 PM IST

ताज्या बातम्या