JOIN US
मराठी बातम्या / देश / धक्कादायक: गोव्यातल्या वास्को इथं एकाच भागात सापडले 41 पॉझिटिव्ह रुग्ण

धक्कादायक: गोव्यातल्या वास्को इथं एकाच भागात सापडले 41 पॉझिटिव्ह रुग्ण

या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अन्य नागरिकांच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. या रुग्णांमुळे गोव्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 119 झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनिल पाटील, पणजी 3 जून: गोव्यातुन कोरोना बाबतची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोव्यातल्या वास्को येथील मांगुर हिल भागात सुमारे 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी या भागातील एका कुटुंबातील सहाजण पॉझिटिव सापडल्याने प्रशासनाने हा संपूर्ण परिसर सील करून कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. या भागातल्या अन्य नागरिकांच्या चाचण्या घेतल्या असता यातून 41 जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सामाजिक संसर्गाचा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अन्य नागरिकांच्या चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. या रुग्णांमुळे गोव्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 119 झाली आहे.  यातील 62 रुग्ण ॲक्टिव रूग्ण आहेत. या रुग्णांवर मडगावच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बईतील कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांचं प्रमाण आता कमी झालं आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे, असं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येतं आहे. आठवडाभरापूर्वी म्हणजे 27 मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत नवीन कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 5.17% होता. जो 2 जूनला 3.64% झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे. महाराष्ट्रातील रिकव्हरी रेटही वाढला राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्चच्या तुलनेत मेमध्ये सुमारे साडेतीन पटीने जास्त रुग्ण बरे झालेत. रुग्ण बरे होण्याचा दर 43.35% एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5℅ दिवसांवर गेला आहे. हेही वाचा - मोदी सरकारने  शेतकऱ्यांसाठी घेतला हा सर्वात मोठा निर्णय, 5 दशकांची मागणी पूर्ण बापरे! मुंबई विमानतळावर थोडक्यात टळला अपघात …आणि बघता बघता अख्खं लोखंडी होर्डिंग वाऱ्याने उडवलं; डोंबिवलीचे VIDEO VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या