Home /News /news /

बापरे! मुंबई विमानतळावर थोडक्यात टळला अपघात

बापरे! मुंबई विमानतळावर थोडक्यात टळला अपघात

या घटनेनंतर एकदम गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी यावर तातडीने उपाययोजना करीत विमान धावपट्टीवरुन बाजूला केले.

    मुंबई, 3 जून : मुंबई विमानतळावर मालवाहू विमानाचा अपघात टळला आहे. बंगळुरुहून आलेलं विमान निश्चित स्थळी न थांबले आणि ते पुढे गेले. त्यामुळे एकमद गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी यावर तातडीने उपाययोजना करीत विमान धावपट्टीवरुन बाजूला केले. बंगळुरुहून मुंबईत उतरत असताना FeD Ex हे विमान 14 क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरणार होते. मात्र हे विमान ठरविलेल्या ठिकाणी व वेळेत उतरले नाही तर तब्बल 9 मीटर पुढे गेले. त्यानंतर तातडीने हे विमान दूर करण्यात आले. सुदैवाने या विमानाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. बंगळुरुहून आलेले मालवाहू विमान मुंबईला थांबून दुबईला रवाना होणार होते. दरम्यान आज निसर्ग चक्रीवादळाचा धोका असल्याने मुंबईतील हवाईसेवा दुपारी अडीच ते 7 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विमानतळ साडेचार तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2.30 वाजता विमानतळ बंद करण्यात आले असून सायंकाळी 7 वाजता उघडण्यात येणार आहे. त्यानंतर परिस्थीती पाहून विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले आहे. पुढील  काही तासात हे वादळ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती सांगितली जात होती. मात्र मुंबईकरांसाठी आता दिलासादायक बाब आहे. चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी वर्तवली आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे. हे वाचा-WHO चीनवर नाराज; कोरोनासंबंधात इटलीच्या तज्ज्ञांचा दावाही फेटाळला Nisarga Effect : चक्रीवादळामुळे चारजणं जखमी; अद्याप जीवितहानी नाही
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cyclone

    पुढील बातम्या