नवी दिल्ली, 25 जुलै : राजस्थान काँग्रेसचे सचिन पायलट यांच्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत पार्टीत सक्रिय झाले आहेत. वैभव गेहलोत आज जयपूरमध्ये विरोध आंदोलनात पोहोचले आहेत. काँग्रेस आज संपुर्ण राज्यातील जिल्हा मुख्यालयांमध्ये भाजपविरोधात आंदोलन करीत आहेत. काँग्रेसचा आरोप आहे की केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाहीने तयार झालेली सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही लोकशाहीच्या मूल्यांची हत्या आहे. काँग्रेसच्या आंदोलनात पोहोचले वैभव गेहलोत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सुपूत्र वैभव गेहलोत जयपूरमध्ये सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनात पोहोचले आणि भाजपवर निशाणा साधला. वैभव गेहलोत काँग्रेसचे महासचिव आहेत. मात्र ते केव्हाच पक्षाच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. सचिन पायलट पक्षाच्या बाहेर गेल्यानंतर ते पार्टीच्या कार्यक्रमात पोहोचले आहेत. व्यासपीठावरुन भाजपवर हल्ला करीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पूत्र वैभव म्हणाले की – तुम्ही पाहात आहात की कशा प्रकारे भाजप एका लोकशाहीने तयार केलेली सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे वाचा- ‘…अन्यथा शरयू नदीत जलसमाधी घेईन’; राममंदिर भूमीपुजनावरुन आजम खान यांचा इशारा अशोक गेहलोत यांची चर्चा करीत असताना पुढे वैभव म्हणाले – हे एक असं सरकार आहे की ज्यामध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी चांगली कामगिरी बजावली. ज्या सरकारने कोरोनाच्या संकटात चांगलं काम केलं त्यांनाच केंद्रातून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वैभव गेहलोत राज्यस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये जेव्हा वैभव गेहलोत यांना राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर निवडणूक लढत होते, त्यावेळी सचिन पायलट यांनी काही अंशी विरोध दर्शविला होता.