अयोध्या, 25 जुलै : रामनगरी अयोध्यामध्ये येत्या 5 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य राम मंदिराचा आधारशिला रचली जाणार आहे. यावेळी शनिवारी मुस्लीम कारसेव मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजम खाम यांनी अयोध्येला जाऊन प्रतिज्ञा घेतली आहे.
त्यांचं म्हणणं आहे की जर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी भूमी पूजन कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित केलं नाही तर त्याच दिवशी शरयू नदीत जलसमाधी घेतील. त्यांचं म्हणणं आहे की – त्यांनी राम मंदिर आंदोनल केलं आणि ते भगवान रामावर विश्वास ठेवणारे आहेत. तेही रामाचे भक्त आहेत.
हे वाचा-चीनला धक्का : 72 तासांत दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेच्या आदेशावर चीनची धमकी
भगवान राम यांना कोणत्याही धर्म वा जातीमध्ये बांधलं जाऊ शकत नाही. यासाठी या पुण्य कामात ते ही सहभागी होऊन राम मंदिर भूमी पुजनाचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत. अयोध्येला पोहोचलेले आजम खान म्हणाले की – भगवान रामालाही माझं अराध्य दैवत मानतो. ज्याप्रमाणे भगवान राम व लक्ष्मण यांनी या शरयू नदीत जलसमाधी घेतली होती, त्याचप्रमाणे तेदेखील येथे जलसमाधी घेईन. आजम खान यांनी राम लल्ला यांचं दर्शन घेतलं आणि काम मंदिर आंदोलनाचे स्वर्गीय महंत रामचंद्र दास परमहंस यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण केली.
येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचं भूमीपुजन होणार आहे. यावरुन सध्या राजकारण तापलेलं असल्याचं दिसत आहे. अनेक राजकीय पक्षांनी कोरोनाच्या संकटात मोदींनी भूमीपुजनाला उपस्थिती लावणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. काहींनी तर या भूमीपुजनाच्या कार्यक्रमावरच आक्षेप घेतला आहे.
सध्या देशभरता कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना काळात सर्वच सण-उत्सव घरात अत्यंत साधेपणाने करण्याचं आवाहन केलं जात असताना मोदींच्या राम मंदिर भूमीपुजनाला अनेकांकडून विरोध केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir, Azam Khan, Narendra modi