इटालिअन दाम्पत्य आणि दत्तक घेतलेले मूल
शक्ति सिंह, कोटा, 17 जुलै : जगभरात अशी अनेक दाम्पत्ये आहेत, ज्यांना संतती प्राप्त होत नाही. अशा परिस्थितीत ते अनाथ आश्रमातून लहान मूल दत्तक घेतात. त्यामुळे त्यांच्या मुलाचेही स्वप्न पूर्ण होते आणि निराधार बाळालाही आई वडिलांचे प्रेम मिळते. यामध्ये काही मुले इतकी नशीबवान असतात की त्यांना श्रीमंत आईवडील मिळतात. तर अनेकदा विदेशात राहणारे आईवडील मिळतात. अशीच एक घटना राजस्थानच्या कोटा येथून समोर आली आहे. यामध्ये एक विदेश दाम्पत्य भारतातून एक बाळ दत्तक घेऊ इच्छित होते. त्यामुळे त्यांनी केंद्रीय दत्तक ग्रहण एजेंसीच्या माध्यमातून राजस्थानमधील कोटाच्या श्री करणी नगर विकास समितीमधून बाळ दत्तक घेतले. इटली येथील हे दाम्पत्य बऱ्याच कालावधीपासून केंद्रीय दत्तक ग्रहण एजेंसीच्या संपर्कात होते तसेच त्यांना भारतातून मूल दत्तक घ्यायचे होते.
यानंतर त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत इटालिअन दाम्पत्याला कोटा येथील श्री करणी नगर विकास समितीच्या दीड वर्षांच्या मुलाला दत्तक घेतले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांनी या बाळाला आपल्या जवळ घेतले, तेव्हा ते फार भावूक झाल्याचे दिसले. दीड वर्षाच्या या मुलाला इटालिअन दाम्पत्याने दत्तक घेतले. यावेळी कलेक्टक ओपी बुनकर, बालकल्याण समितीचे अध्यक्ष राजेंद्र राठौर, उपनिदेशक अजीत शर्मा यांनी आशीर्वाद देऊन आई-वडिलांकडे सोपविले. तर याबाबत प्रवीण भंडारी यांनी सांगितले की, परदेशात जाणारे हे दुसरे बाळ आहे. याआधी सुद्धा एका मुलाला एका विदेशी दाम्पत्याने दत्तक घेतले होते. श्री करणी नगर विकास समितीकडून वर्षभरात 4 मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत आमच्या इतून जवळपास 1000 हून अधिक मुलांना भारत आणि पदेशातील दाम्पत्यांना देण्यात आले आहे.