JOIN US
मराठी बातम्या / देश / Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन

Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन

मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंजाब, 25 एप्रिल : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाश बादल हे 5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोमवारी प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टराची टीम त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होती. (‘अजितदादा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत…’, राष्ट्रवादीचा व्हीप बजावणाऱ्या नेत्याने उचलला विडा!) प्रकाश सिंह बादल यांना ‘गॅस्ट्राइटिस’ आणि श्वास घेण्याचा त्रास होता. मागील वर्षी जून महिन्यात सुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनानंतर त्यांना आरोग्य तपासणीसाठी फेब्रुवारी 2022 मध्ये मोहाली येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मागील वर्षी बादल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लुधियाना येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (पाकिस्तानी वंशाचे ज्येष्ठ लेखक तारिक फतेह यांचं निधन) बादल यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा आणि अकाली दलाचे प्रमुख खबीर सिंह बादल आणि मुलगी परनीत कौर आहे. त्यांचं लग्न माजी कॅबिनेट मंत्री आदिश प्रताप सिंह कैरो यांच्याशी झालं. अकाली दलाचे ते प्रमुख उमेदवारांपैकी एक होते. पण आम आदमी पार्टी (आप) चे उमेदवार गुरमीत सिंह खुडियन यांनी त्यांना पराभूत केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या