JOIN US
मराठी बातम्या / देश / मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 8 कोटी PF धारकांना बसेल मोठा धक्का

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 8 कोटी PF धारकांना बसेल मोठा धक्का

finance ministry कडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा फटका हा PF धारकांना बसू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जून : मोदी सरकार PF संदर्भात घेणाऱ्या निर्णायामुळे PF धारकांना मोठा धक्का बसू शकतो. एका मीडिया रिपोर्टनुसार अर्थ मंत्रालयानं EPFOचा व्याज दर हा वर्षाला 8.65 टक्क्यानं कमी करण्यास सांगितला आहे. PFवर अधिक व्याज दिल्यास बँकांना आकर्षक व्याज देणं शक्य नसल्याची चिंता अर्थ मंत्रालयाला असल्याची माहिती रॉयटर्स या न्यूज एजन्सीनं दिली आहे. ज्याचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. यापूर्वी अर्थ मंत्रालयानं EPFO व्याज देण्यासाठी किती फंड उपलब्ध आहे? याबाबत विचारणा केली होती. नोकरदारांच्या पगारातील काही पैसा हा कापून PFमध्ये जमा केला जातो. देशातील 20 टक्के नोकरदार वर्गाच्या पगारातून PF कापला जातो. त्यामुळे वर्षाला 8.65 टक्के व्याज कमी करण्याच्या निर्णयाचा फटका कामगार वर्गाला बसू शकतो. स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये; SNB Reportमधून खुलासा काय आहे PF Employee Provident Fund ही स्किम कर्मचारी वर्गाला निवृत्तीनंतर आर्थिक फायदा देण्यासाठी चालवली जाते. PFचं व्याज किती असावं याचा निर्णय सरकार घेते. सध्या PF धारकांना 8.65 टक्के व्याज मिळत आहे. PFचा पैसा कुठे गुंतवला जातो? देशातील 20 टक्के कामगार हा PFचा लाभार्थी आहे. या कामगारांच्या पगारातून ठराविक रक्कम ही महिन्याला कापली जाते. EPFO 85 टक्क्यापेक्षा जास्त रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये, कंपन्यांमध्ये गुंतवते. यापूर्वी EPFOनं तोट्यात गेलेल्या IL&FSमध्ये देखील गुंतवणूक केली होती. VIDEO: दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे- मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली होती घोषणा 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी PF धारकांना 8.65 टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली होती. पण, आता PFवरच्या व्याजदरात कपात होण्याचा विचार अर्थ मंत्रालयानं सुरू केला आहे. VIDEO: अखेर पावसाची प्रतीक्षा संपली! मुंबईसह राज्यात दमदार पावसाची हजेरी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या