स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये; SNB Reportमधून खुलासा

स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये; SNB Reportमधून खुलासा

Swiss Bank : स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये असल्याचा बाब आता समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जून : स्विस बँकेतील काळ्या पैशावरून सध्या देशात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. 2014मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपनं देखील काळ्या पैशाचा मुद्दा उचलला होता. दरम्यान, स्विस बँकेनं देखील भारतीयांची नावं जाहीर करण्याची आणि स्विस बँकेतील पैशाची आकडेवारी जाहीर करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर भारतीयांचा स्विस बँकेत असलेल्या पैशाची आकडेवारी समोर आली आहे. SNB Report नुसार स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये जमा आहेत. 2018मध्ये स्विस बँकेत भारतीयांचे 6757 कोटी रूपये जमा जाले होते. पण, 2017ची तुलना करता ही रक्कम 6 टक्क्यांनी कमी आहे. 2016मध्ये मात्र स्विस बँकेत 675 मिलियन स्विस फ्रैंक जमा होते. स्विस बँकेत जमा करण्यात आलेले पैसे हे व्यक्ती, कंपनी यांच्या मार्फत असल्याचं देखील SNB Reportनं म्हटलं आहे. महत्त्वाचे म्हणजे स्तोमक विस बँकेतील काळ्या पैशाबाबत मात्र SNB Reportमध्ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. स्विस बँकेत पैसे जमा करण्यामध्ये 2017मध्ये भारत 73व्या स्थानी होता. तर, 2016मध्ये भारत 88व्या स्थानावर होता.

मुलींची छेड काढाल तर याद राखा, पहिले 'रेड कार्ड' नंतर मिळणार ही शिक्षा

50 भारतीयांना नोटीस

स्वित्झर्लंडनं 50 भारतीयांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये भारत सरकराला माहिती देण्यापूर्वी अपिलाची एक संधी देण्यात आली आहे. 21 मे रोजी 11 भारतीयांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये 1949मध्ये जन्म झालेल्या कृष्ण भगवान रामचंद आणि 1972मध्ये जन्म झालेल्या कल्पेश हर्षद किनारीवाला यांचा समावेश आहे.

नेहमीच्या अभ्यासाचा कंटाळा आला? मग निवडा ही ऑफबीट करियर

काही नावांमधील सुरूवातीचे अक्षर आले समोर

तसंच स्वीस बँकेतील खात्यासंदर्भात काही नावांचे सुरूवातीची अक्षरं समोर आली आहेत. यामध्ये 24 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेले एसएसबीके, 9 जुलै 1944 रोजी जन्म झालेले बीकेआय, 2 नोव्हेंबर 1983 रोजी जन्म झालेल्या पीएएस, 22 नोव्हेंबर 1973 रोजी जन्म झालेल्या आरएएस, 27 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेल्या एपीएस, 14 ऑगस्ट 1949 रोजी जन्म झालेले एडीएस, 20 मे 1935 रोजी जन्म झालेले एमएलए, 21 फेब्रुवारी 1968 रोजी जन्म झालेले एनएमए आणि 27 जून रोजी जन्म झालेले एमएमए यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांना अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये वाड्याचा काही भाग कोसळला

First published: June 28, 2019, 9:31 AM IST

ताज्या बातम्या