India's Prime Minister Narendra Modi looks on at the ASEAN-India Summit on the sideline of the 35th ASEAN Summit in Bangkok, Thailand November 3, 2019. REUTERS/Athit Perawongmetha - RC17CE7A4750
नवी दिल्ली 09 एप्रिल : कोरोनाचा प्रकोप देशात वाढतो आहे. दररोज रुग्णांच्यां संख्येत मोठी वाढ होत आहे. मृत्यूची संख्याही वाढतो आहे. कोरोना विरुद्धची लढाई ही दिर्घकाळ लढावी लागेल असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिले आहेत. कोरोनाचा माणसांच्या दररोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. ही मोठी लढाई असल्याने त्याविरुद्ध लढण्यासाठी मोदी सरकारने एक ‘मास्ट प्लान’ तयार केला आहे. तीन टप्प्यात त्याची अमंलबजावणी होणार आहे. कोरोना व्हायरस हा सर्व जगासाठीच नवा असल्याने त्याविरुद्ध कसं लढायचं यावर प्रयोग सुरू आहेत. कुठलाही ठोस पर्याय किंवा औषध नसल्याने विविध प्रयोग करण्यात येत आहेत. मोदी सरकारही ही योजना तीन टप्प्यात असून त्याचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. याबाबतच वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. पहिला टप्पा - जानेवारी 2020 ते जून 2020 दुसरा टप्पा- -जुलै 2020 ते मार्च 2021 तिसरा टप्पा - एप्रिल 2021 ते मार्च 2024
असा असणार आहे. कोरोनाचा विस्तार मोठा असल्याने सगळ्याच गोष्टींची कमतरता जाणवत आहे. जागा, साधनं, सुविधा, साहित्य, प्रशिक्षण, जनजागृती, लोकसभाग अशा सगळ्याच बाबातीत करण्यासाठी प्रचंड काम आहे. त्यासाठी PMOच्या देखरेखी खाली विविध मंत्रालयाच्या टिम्स तयार करण्यात आल्या असून त्यात विविध तज्ज्ञ व्यक्तिंचा समावेश सरकार करणार आहे. PPE सूट, व्हेंटिलेटर्स, नवे कोव्हिड हॉस्पिटल्स, नवी वाहनं, संशोधन अशा सगळ्या गोष्टींच त्यात समावेश राहणार आहे. यात खासगी संस्था, प्रयोगशाळा, सामाजिक संस्था, उद्योग संस्था अशा सगळ्यांना सामावून घेतलं जाणार आहे. संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) झुंज देत आहे. या कठीण काळात भारत संपूर्ण जगासाठी एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आला आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची अमेरिकेत (America) निर्यात करण्याला मान्यता दिली आहे. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘थँक्स इंडिया’ असं ट्विटर म्हटलं होतं. अमेरिकेने आभार व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) दिलेल्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटरवर लिहिलं की, ‘अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. अशा वेळी मित्र आणखी जवळ येतात. भारत-अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आणि मानवतेला मदत करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. कोविड -19 विरोधातील लढा आपण मिळून जिंकू.