ओंचियाम, 13 जून : देशभरात कोरोना व्हायरसमुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. याशिवाय काही राज्यांनी लॉकडाऊन आपल्या पातळीवर वाढवण्याचा निर्णयही घेतला होता. या लॉकडाऊनदरम्यान अनेक उद्योग-धंदे छोटे व्यवसाय बंद झाले तर काही बंद होण्याच्या मार्गावर आले. याच दरम्यान अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. या दरम्यान केरळमधील एका शिक्षकाची नोकरी गेल्यानं त्याच्यावर मजुरी करण्याची वेळ आली आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेस नं दिलेल्या वृत्तानुसार 55 वर्षांचे पालेरी मिथल बाबू हे केरळच्या ओंचिअमचे रहिवासी आहेत. ते 30 वर्षांपासून शाळेत मुलांना इंग्रजी शिकवत होते. लॉकडाऊन आणि कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा बंद आहेत त्यामुळे पगार नाही. पोटापाण्यासाठी त्यांच्यावर मजुरी करण्याची वेळ आली आहे. पोट भरण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी त्यांना मजुरी करावी लागत आहे. हे वाचा- 18 दिवस व्हेंटिलेटरवर सुरू होती मृत्यूशी झुंज, चिमुकलीनं जिंकलं कोरोना युद्ध शाळा-महाविद्यालयं कधी सुरू होतील माहीत नाही. कुटुंबाची जबाबदारी असल्यानं काम करावं लागत असल्याचं बाबू यांनी सांगितलं. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते बांधकामाच्या ठिकाणी मोलमजुरी करतात. बाबू यांनी गरिबीत शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी इंग्रजीमधून BA केलं. पुढे त्यांनी नोकरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदर्निवाह सुरू केला. त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला असून भारतात आतापर्यंत एकूण 3,08,993 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक 11458 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे वाचा- पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला, नवरदेवाला लागण संपादन- क्रांती कानेटकर