जम्मू-काश्मीरमध्ये घडली घटना
राजौरी, 05 मे : जम्मू-कश्मीरमधील राजौरीमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. या कारवाईमध्ये भारतीय सैनाचे 5 जवान शहीद झाले आहे. यामध्ये काही जवान जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर अजूनही सैन्याचं ऑपरेशन सुरू आहे. खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी येथील कंडी परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. दहशतवाद्यांनी अचानक जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी 5 जवान शहीद झाले आहे. तर 4 जवान जखमी झाले आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमी जवानांना उधमपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या टीमला या परिसरात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. सीआरपीएफचे जवान शोध घेत असताना अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. या ठिकाणी 2 ते 3 दहशतवादी लपून बसले असल्याचा संशय आहे.