JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठा भाऊ असा असतो का? लहान भावासोबत जे घडलं, ते पाहून पोलीस हादरले

मोठा भाऊ असा असतो का? लहान भावासोबत जे घडलं, ते पाहून पोलीस हादरले

या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

जाहिरात

(मोठ्या भावाच्या कृत्यामुळे खळबळ)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चित्रकूट, 31 मे : माणसाच्या जिवापेक्षा त्याची मालमत्ता लाखमोलाची मानणारे नराधम संपत्तीसाठी एखाद्याचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी मोठ्या भावाने आपल्या लहान भावाच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्लात लहान भावाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रकूट भागातील हरीसन पुरवा गावात जमिनीच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाच्या कुटुंबीयांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. यात लहान भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर 4 जण गंभीर जखमी झाले. राजनारायण असं मोठ्या भावाचं नाव आहे. तर त्याच्या हल्ल्यात राजकरणचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

अधिक माहिती अशी की, राजनारायणच्या हल्ल्यात राजकरण गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची नाजूक परिस्थिती पाहून तेथील डॉक्टरांनी त्याला प्रयागराजला हलविण्यास सांगितलं. तर, इतर 4 कुटुंबीयांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. दुर्दैवाने प्रयागराजला उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी राजकरणचा मृत्यू झाला. (Solapur News : आधी पत्नीचा सत्तूरने गळा चिरला; नंतर पतीचं धक्कादायक पाऊल, सोलापूर हादरलं) नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यावेळी राजनारायण आणि त्याच्या मुलांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. मात्र आता हे प्रकरण हत्येच्या दिशेने वळवून लवकरात लवकर आरोपींना अटक होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या