JOIN US
मराठी बातम्या / देश / ट्रम्पतात्यांच्या दौऱ्यात होणार कोट्यवधींची उधळपट्टी, 3 तासांचा खर्च 100 कोटी

ट्रम्पतात्यांच्या दौऱ्यात होणार कोट्यवधींची उधळपट्टी, 3 तासांचा खर्च 100 कोटी

डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याची सुरुवात ते अहमदाबादमधून करणार आहेत. त्यांच्या 3 तासांच्या दौऱ्यासाठी 100 कोटींचा खर्च करण्यात येणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 15 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यादेखील भारतात येणार आहेत. या भेटीच्या सगळ्या नियोजनावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. डोनाल्ड ट्रम्प आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातमधून करणार आहेत. ते पहिल्यांदा अहमदाबादला भेट देणार आहे. डोनार्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यासाठी गुजरात सरकार वारेमाप पैसा खर्च करणार आहे. जगातील बलाढ्य आणि शक्तिशाली राष्ट्राच्या अध्यक्षाच्या स्वागताची तयारी संपूर्ण अहमदाबाद शहरात दिसून येतेय. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पैशांची कमतरता भासू नये असे फर्मानच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काढलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या 3 तासांच्या दौऱ्यासाठी गुजरात सरकार जवळपास 100 कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे. एवढंच काय तर ट्रम्प यांच्या प्रवासाच्या मार्गावर जिथं झोपडपट्टीचा परिसर आहे त्या लपवण्यासाठी भिंतही उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या आदेशानुसार अहमदाबाद महानगरपालिका आणि अहमदाबाद शहर विकास प्राधिकरण रस्ते दुरुस्तीच्या कामाला लागलेत. या सगळ्यासाठी सुमारे 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अहमदाबादच्या जवळपास 17 रस्त्यांचं डांबरीकरण सुरू करण्यात आलं आहे. तर मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर ट्रम्प एअरपोर्टवर परतणार आहेत. त्यांचा तो परतण्याचा मार्ग 1.5 किलोमीटरचा आहे. तो रस्ता नवाच बनवण्याचं काम जोरात सुरू आहे.या रस्ते बांधणीसाठी जवळपास 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यासाठी गुजरातमध्ये करण्यात येणाऱ्या खर्चापैकी काही खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे. मात्र या खर्चातील जास्तीत जास्त खर्च हा गुजरात राज्य सरकारला उचलावा लागणार आहे. संपूर्ण शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी राज्याच्या अऱ्थसंकल्पात 500 कोटींची तरदूत करण्यात आली होती. याच रकमेचा वापर मोटेरा स्टेडियम, विमानतळ आणि साबरमती आश्रमाजवळचे रस्ते दुरूस्तीसाठी केला जाणार आहे. मोदींचं प्रोजेक्ट ठाकरे सरकार करणार पूर्ण; काँग्रेसचा विरोध डावलून 1 मेपासून NPR तर ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 12 ते 15 कोटींचा खर्च होणार आहे. मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘केम छो ट्रम्प’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाखाहून अधिक लोक येणार आहेत. त्यांच्या प्रवास आणि नाश्त्याच्या सोयीसाठी 7 ते 10 कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसंच ट्रम्प यांच्या रॅलीमार्गावरील रस्त्यांचं सुशोभीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बाप रे! हा तर केमिकल हल्ला, ’ Coronavirus ’ वर गृहमंत्र्यांचा अजब दावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या