पुणे, 15 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेक लोकांचा या व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. या सगळ्यात या व्हायरसबाबत अनेक अफवाही पसरवल्या जात आहेत. अमुक केलं तर व्हायरस होतो. अमुक खाऊ नका त्याने कोरोना व्हायरस होतो. तमुक प्यायलं तर कोरोनाची लागण होते असे अनेत तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोना व्हायरसमुळे भीती निर्माण झाली आहे.
पुलवामा हल्ल्यातील शहिदाच्या पत्नीवर आली भाजी विकण्याची वेळ
त्यातच आता कोरोनाव्हायरस हा केमिकल हल्ला असल्याचा दावाही केला जात आहे. आणि हा दावा केला आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. कोरोनाव्हायरसमुळे नवं केमिकल शस्त्र जगापुढे आलं आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरस हा एकप्रकारचा केमिकल हल्ला असल्याचा अजब दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुखांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे याची खात्री नाही, मात्र अनिल देशमुखांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.
देशांवर मोठा हल्ला करण्यासाठी आजकाल केमिकल वेपन( Chemical Weapons )चा वापर केला जाऊ लागला आहे. सिरीयामध्ये अनेकदा असे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये हजारो लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाव्हायरसमुळेही देशभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यामुळेच कोरोनाव्हायरसही अशाच प्रकारचा एक केमिकल हल्ला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
शाहीनबाग आंदोलक आणि अमित शाहांच्या भेटीचं वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळलं
लोकसत्ता वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलं आहे. पुण्यात साहित्य कलाप्रसारणी सभा यांच्यावतीने मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांची मुलाखत घेतली. यावेळी गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखत कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महेंद्र रोकडे, रवीद्र डोमाळे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्याशी जुळले अन् पहिल्याला फसवले, सहन नाही झाले कॉन्स्टेबलने विष घेतले!