JOIN US
मराठी बातम्या / देश / सावधान! मोबाइल फोनमुळे पसरू शकतो कोरोना, डॉक्टरांनी दिला 'हा' इशारा

सावधान! मोबाइल फोनमुळे पसरू शकतो कोरोना, डॉक्टरांनी दिला 'हा' इशारा

एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका गटाने कोरोना साथीच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये मोबाइल वापराबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 मे : रायपूर इथल्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका गटाने कोरोना साथीच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये मोबाइल वापराबाबत इशारा दिला आहे. मोबाइलसारखी उपकरणं कोरोना व्हायरसचे वहन करू शकतात. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये एका लेखात डॉक्टरांनी म्हटलं की, मोबाइलचा संपर्क थेट चेहरा किंवा तोंडाशी असतो. जरी हात धुतले असले तरी ते धोकादायक असतं. प्रत्येक आरोग्य कर्मचारी 15 मिनिटं ते दोन तासात त्यांचा फोन वापरत असतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसी सारख्या आरोग्य संघटनांनीसुद्धा अनेक आदेश दिले आहेत. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटलं आहे की, मोबाइलच्या वापराबाबत कोणताच उल्लेख यामध्ये नाही. WHO ने कोरोनाला रोखण्यासाठी दिलेल्या नियमावलीतही हे सांगितलेलं नाही. कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे की, आरोग्य केंद्रांमध्ये फोनचा वापर इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क आमि संवादासाठी, औषधं शोधण्यासाठी तसंच इतर गोष्टींची माहिती घेण्यासाठी केला जातो. जर्नलमधील लेख डॉक्टर विनित कुमार पाठक, सुनील कुमार पाणिग्रही, डॉ. एम मोहन कुमार, डॉक्टर उत्सव राज आणि डॉक्टर करपागा प्रिया पी यांनी लिहिला आहे. या लेखात म्हटलं आहे की, चेहऱ्याशी थेट संपर्कात येण्यामध्ये मास्क, कॅप आणि चश्म्यानंतर मोबाइलचा क्रमांक लागतो. तसंच इतर तीन गोष्टींची स्वच्छता करतो तशी मोबाइलची होत नाही. त्यामुळे फोनपासून संसर्गाचा धोका आहे. हे वाचा : कोरोनारुग्णांच्या संख्येत भारताने चीनला टाकलं मागे; 84,712 झाला आकडा रुग्णालयात मोबाइल फोनच्या स्वच्छतेसह त्याच्या योग्य वापराची मागणी डॉक्टरांनी या लेखामधून केली आहे. भारतात झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, काही रुगणालयात जवळपास 100 टक्के कर्मचारी मोबाइल वापरतात. मात्र त्यातील केवळ 10 टक्के लोकच तो स्वच्छ ठेवतात. सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की फोन सतत हातात असतो. त्यामुळे फोनपासून हातावर रोगजंतूंचा संसर्ग व्हायला वेळ लागणार नाही. हे वाचा : आता कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी तयार राहा; आरोग्य तज्ज्ञांनी केलं सावध सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार मोबाइल फोन, काउंटर, टेबलचा वरचा भाग, दरावाज्याच्या कड्या, शौचालयातील नळ, की बोर्ड यांना सर्वाधिक वेळा स्पर्श केला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी संसर्गाचा धोका असतो. नवी दिल्लीतील एम्समधील रेसिडेट डॉक्टर्स असोसिएशनचे महासचिव डॉक्टर श्रीनिवास राजकुमार टी यांनी म्हटलं की, आरोग्य केंद्रांच्या बाहेरसुद्धा मोबाइलच्या वापराबाबत लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तो सर्व ठिकाणी घेऊन जातात. हे वाचा : लॉकडाऊन 4.0 मध्ये मिळू शकते मोठी सूट, 11 राज्य करत आहेत प्लानिंग

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या