डॉ. मनोज चौधरी
हिमांशु अग्रवाल, प्रतिनिधी छतरपूर, 9 मार्च : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एक डॉक्टर बुंदेलखंडमधील मुलांसाठी देवदूत बनला आहे. तुम्हाला ऐकताना विचित्र वाटत असेल पण हो, खरे आहे. याठिकाणी असे एक डॉक्टर आहेत जे मुलांच्या घशात अडकलेले नाणे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय अगदी सहजपणे काढतात. डॉ.मनोज चौधरी असे त्यांचे नाव आहे. ते जिल्हा शासकीय रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. डॉ.मनोज चौधरी यांनी आतापर्यंत 112 बालकांच्या गळ्यातील नाणी काढून त्यांचे प्राण वाचवले आहेत. यामुळे डॉ.मनोज चौधरी आता निरागस बालकांसाठी पृथ्वीवरील देवच बनले आहेत. जिल्हा रूग्णालयात आपली सेवा देणारे डॉ.मनोज चौधरी हे आपल्या कर्तव्याप्रती इतके जागरूक असतात की, जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा ते सर्व काही सोडून जिल्हा रूग्णालयात रुग्णासाठी धाव घेतात. दोन वर्षांपूर्वी गळ्यात ५ रुपयांचे नाणे अडकवून एक रुग्ण रात्रीच्या वेळी जिल्हा रुग्णालयात आला होता. त्या रुग्णाचे वय 35 वर्षे होते. त्याला कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करून रुग्णालयाचे सर्जन मनोज चौधरी यांना आपत्कालीन सेवेसाठी बोलावले. त्यानंतर डॉक्टर मनोज यांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता कॅथेटरच्या सहाय्याने अन्ननलिकेच्या आत अडकलेले 5 रुपयांचे नाणे बाहेर काढले. अवघ्या 5 मिनिटात त्यांनी हे करत या रुग्णाचा जीव वाचवला.
अशाप्रकारे काढतात शिक्का - डॉक्टर मनोज सांगतात की, घशात अडकलेले नाणे काढण्यासाठी कॅथेटरची रबर ट्यूब नाकापासून घशाच्या खालच्या भागात घातली जाते. त्यानंतर, सिरिंजद्वारे ट्यूबमध्ये शुद्ध पाण्याने भरुन आणि ट्यूब फुगवून, जेव्हा ट्यूब बाहेर खेचली जाते तेव्हा नाणे घशातून बाहेर येते. बागेश्वर धाममध्ये महाउत्सव, पंडित धीरेंद्र शास्त्रींनी भक्तांसोबत खेळली होळी, VIDEO 112 मुलांचे वाचविले प्राण - डॉ.मनोज चौधरी यांनी या तंत्राने आतापर्यंत 112 मुलांना त्यांच्या गळ्यातील 5 आणि 10 रुपयांची नाणी काढून नवीन जीवन दिले आहे.