जाहिरात
मराठी बातम्या / देश / बागेश्वर धाममध्ये महाउत्सव, पंडित धीरेंद्र शास्त्रींनी भक्तांसोबत खेळली होळी, VIDEO

बागेश्वर धाममध्ये महाउत्सव, पंडित धीरेंद्र शास्त्रींनी भक्तांसोबत खेळली होळी, VIDEO

 बागेश्वर धाममधील होळी!

बागेश्वर धाममधील होळी!

बागेश्वर धाममध्ये होळीचा महाउत्सव पाहायला मिळाला.

  • -MIN READ Local18 Chhatarpur,Madhya Pradesh
  • Last Updated :

हिमांशु अग्रवाल, प्रतिनिधी छतरपूर, 9 मार्च : राज्यासह देशात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यासोबतच बागेश्वर धाममध्येही होळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम येथेही होळी साजरी करण्यात आली. येथे बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपल्या भक्तांसोबत होळी खेळली. बागेश्वर धाममधील होळीचा हा सोहळा 9 मार्चपर्यंत चालणार आहे. या होळी उत्सवात दूरदूरवरून आलेल्या भाविकांनी चित्रपट आणि बागेश्वरधामच्या भक्तिगीतांवर जल्लोष केला. इतकंच नाही तर धीरेंद्र कृष्ण शास्त्रीही होळीच्या उत्साहात रंगात रंगलेले दिसले. त्यांनी भाविकांसह होळी साजरी केली. बागेश्वर धाम येथे होळी खेळण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पोहोचले आहेत. दुपारपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितल्याप्रमाणे यावेळी होळी सामाजिक सलोख्याने साजरी केली जात आहे. यासोबतच बागेश्वरधाममध्येही होळीचा राजकीय रंग पाहायला मिळाला. जिथे भाजप आणि काँग्रेसचे नेते मंचावर जमले होते. यासोबतच बागेश्वर धामचे शिष्टमंडळही होळीच्या रंगात रंगमंचावर दिसले. काँग्रेस आमदार नीरज दीक्षित, भाजप आमदार प्रद्युम्न सिंह यांच्यासह सर्व नेते मंचावर जोरदार नाचले.

फुलांची होळी - कार्यक्रमादरम्यान मंचावर मोठी गर्दी झाली होती. येथे बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते अबीर गुलालाची होळी फुलांची उधळण करण्यात आली. तसेच या होळीच्या भव्य कार्यक्रमात सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. इथे अनेक समाजातील लोक येथे जमले होते. या सर्वांना बागेश्वर धामच्या पीठाधीश्‍वरांनी गुलालाची उधळण करून होळीच्या शुभेच्छा दिल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात