नितीन गडकरी भडकले
नवी दिल्ली, 30 मार्च : गेल्या काही महिन्यांपासून विमान सेवा, विमानतळावरील गैरसोयी, प्रवासी आणि क्रू मेंबर्समधील वाद, प्रवाशांचे गैरवर्तन आदी कारणांमुळे विमान कंपन्या सातत्याने चर्चेत येत आहेत. मद्यधुंद प्रवाशांनी विमानात गोंधळ घालण्याच्या घटना अलीकडच्या काळात सामान्य झाल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना नुकतीच घडली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानाने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशाने विमानातील मार्गाच्या कडेला उलट्या केल्या आणि शौचालयाच्या भोवती मलविसर्जन केल्याचं समोर आले आहे. याबाबतची माहिती एका सहप्रवाशाने ट्विटद्वारे दिली आहे. विमानातील महिला क्रू मेंबर्सनी ही सर्व स्थिती यशस्वीपणे हाताळत, स्वच्छता केल्याचे या प्रवाशानं म्हटले आहे. हे ट्विट जोरदार चर्चेत असून, त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. सर्वजण विमानातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करत आहेत.
अलीकडच्या काळात मद्यधुंद प्रवाशांनी विमानात गोंधळ घालण्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 762 या विमानात अशा प्रकारची एक घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रवासादरम्यान, एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने विमानातील मार्गाच्या कडेला उलट्या केल्या आणि शौचालयाभोवती मलविसर्जन केलं आहे. भास्कर देव कोनवर या सहप्रवाशाने ट्विट करत ही घटना उघडकीस आणली आहे. खरं तर देशांतर्गत फ्लाइटमध्ये मद्य दिलं जात नाही. मात्र हा प्रवासी मद्यप्राशन करून विमानात चढल्याचे स्पष्ट झाले आहे.
भास्कर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ``इंडिगो 6E 762 : गुवाहाटी ते दिल्ली. मद्यधुंद प्रवाशाने विमानातील मार्गाकडेला उलट्या केल्या आणि शौचालयाभोवती मलविसर्जन केले. विमानातील महिला कर्मचारी श्वेता यांनी सर्व मार्गाची आणि शौचालयाची स्वच्छता केली. सर्व मुलींनी अपवादात्मकपणे परिस्थिती हाताळली. मुलींच्या शक्तीला सलाम.`` कोनवर यांनी ट्विटसोबत फोटोही शेअर केला आहे. त्यात केबिन क्रूची एक सदस्य प्रवाशानं जिथे उलट्या केल्या ती जागा स्वच्छ करताना दिसत आहे. ही महिला स्वच्छतेसाठी सॅनिटायझेशन स्प्रे आणि टिश्यूजचा वापर करताना दिसत आहे. वाचा - नांदेडमध्ये भीषण अपघात; 4 ठार, 6 जखमी, मृतांमध्ये बाळाचाही समावेश भास्कर यांचे हे ट्विट खूप लक्षवेधी ठरलं आहे. या ट्विटला नेटिझन्सकडून प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स करण्यात आल्या आहेत. या ट्विटमध्ये प्रवाशाच्या निषेधाच्या आणि अशा फ्लायर्सना असुरक्षित परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करणाऱ्या नियमांविरुद्धच्या टिप्पण्या आहेत. तथापि, एका युजरनं विमानात साफसफाई करण्यासाठी पुरेशी साधनं नसल्याकडे लक्ष वेधले आहे. तो म्हणतो, ``यावेळी जरी तो मद्यधुंद प्रवासी होता. पुढच्या वेळी एखादं लहान बाळ, लहान मुलगा किंवा आजारी वृद्ध रुग्ण असू शकतो. माफ करा, परंतु खबरदारी म्हणून सर्व विमानांमध्ये व्हॅक्युम क्लिनर उपलब्ध असावेत.`` दुसऱ्या एक ट्विटर युजर कमेंटमध्ये म्हणतो, `या प्रकरणात फ्लाइट क्रूचा बळी गेल्यासारखं वाटतं. त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना अशी स्वच्छता करावं लागणं हे घृणास्पद आहे. याला `गर्ल पॉवर` म्हणून गौरवणं हे पटण्यासारखं नाही. हे म्हणजे मैला स्वच्छता करायला लागणारे नागरिक हे देशातील भ्रष्टाचाराचे बळी ठरले आहेत हे मान्य करण्याऐवजी त्यांना देशाचे हिरो म्हणून आणखी हिणवण्यासारखं हे आहे.``