JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : चिनी वस्तू नको म्हणजे नकोच! पहिल्या मजल्यावरुन फेकून दिला TV आणि…

VIDEO : चिनी वस्तू नको म्हणजे नकोच! पहिल्या मजल्यावरुन फेकून दिला TV आणि…

देशभरात चिनी कंपन्यांच्या उपकरणांवर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरत, 18 जून : भारत-चीन नियंत्रण रेषेवरील झालेल्या चकमकीत भारतातील 20 जवानांना वीरमरण आलं. या घटनेनंतर समाजात चीनविषयी राग वाढत आहे. सोशल मीडियावर तर चिनी वस्तूंच्या वापरावर बंदीची मोहीम सुरू झाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी 20 जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? तर चिनी कंपन्यांच्या उपकरणांवर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सुरतमधील एका सोसायटीतील आहे. भारत-चीन चकमकीच्या विरोधात या सोसायटीतील सदस्यांनी आपल्याकडील चिनी कंपनीचा TV पहिल्या माळ्यावर फेकून दिला. इतकंच नाही तर टीव्ही फेकल्यानंतर सर्व सदस्य त्या टीव्हीवर दणादणा नाचू लागले. त्या TV ला लाथेने मारू लागले. चीनचा विरोध करीत सर्वजण भारत माता की जय ची घोषणा देत होते. देशातील अनेक भागात चीनविरोधात राग व्यक्त केला जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर चायनीज फूडवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान बुधवारी रात्री दूरसंचार मंत्रालयाने BSNL आणि MTNL सह सर्व खाजगी कंपन्यांना चीनसोबत झालेले करार रद्द करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर चिनी उपकरणांच्या वापरावरही निर्बंध घातले आहेत. यासह जुने करारही रद्द करण्यास सांगितले असून यापुढे यामधील कोणत्याही करारात चीन नसेल, असंही म्हटलं आहे. भारत-चीन तणावादरम्यान मोदी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे हे वाचा- BREAKING : भारतीय बाजारातून चिनी कंपन्या हद्दपार करणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय काय निर्णय घेणार ठाकरे सरकार? चकमकीपूर्वी चिनी कंपन्यांसोबत झाला होता करार संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या