JOIN US
मराठी बातम्या / देश / 'मी म्हणतो, शाळा बांधा, ते म्हणतात, शाहीनबाग', केजरीवाल यांची भाजपवर टीका

'मी म्हणतो, शाळा बांधा, ते म्हणतात, शाहीनबाग', केजरीवाल यांची भाजपवर टीका

दिल्लीच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलंय. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यूज 18 च्या अजेंडा दिल्ली या कार्यक्रमात खास मुलाखत दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : दिल्लीच्या निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलंय. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यूज 18 च्या अजेंडा दिल्ली या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. शाहीनबागमधल्या आंदोलनाचा भाजपला फायदा होतोय. हा मुद्दा संपावा असं भाजपला वाटत नाही, असं ते केजरीवाल म्हणाले. भाजपचे नेते फक्त शाहीनबागबद्दलच बोलतात, त्यांच्याकडे हाच एक मुद्दा आहे. मी म्हणतो शाळा बांधा, ते म्हणतात शाहीनबाग. मी म्हणतो, हॉस्पिटल बांधा, ते म्हणतात शाहीनबाग, अशा शब्दांत केजरीवाल यांनी त्यांचा मुद्दा मांडला. दिल्लीच्या जनतेसमोर जे प्रश्न आहेत त्यावरून त्यांना लोकांचं लक्ष वळवायचं आहे, असंही ते म्हणाले. ‘भाजपमध्ये करंट येईल’ भाजपचे नेते, इथे बटन दाबा आणि करंट तिथे येईल’ अशी भाषा करतात. जर शाहीनबागचा रस्ता खुला झाला तर भाजपमध्ये करंट येईल, असंही त्यांनी सांगितलं. मी शाहीनबागच्या मुद्द्यावरून मागे कसा काय हटू शकतो? मी स्वत:ला हरवण्यासाठी हे करेन का? मी फक्त देशासाठी उभा आहे, असंही केजरीवाल म्हणाले. (हेही वाचा : भाजप खासदाराने राजीव गांधींचा ‘राजीव फिरोज खान’ असा केला उल्लेख) ‘केंद्र रस्ता खुला करत नाही’ शाहीनबागच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची माझी इच्छा आहे पण हा प्रश्न केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो. सरकार हा रस्ता खुला का करत नाही, असाही सवाल त्यांनी विचारला. आंदोलकांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण हा रस्ता खुला झाला पाहिजे. ‘भाजप हा मुद्दा संपवत नाही’ शाहीनबागचा रस्ता सुरू करणं हे भाजपसाठी दोन मिनिटांचं काम आहे पण ते असं करत नाहीत. रस्ता सुरू झाला तर मग निवडणुकीसाठी मुद्दाच उरणार नाही, असंही केजरावील म्हणाले. ========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या