नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : सुधारित नागरिकत्व कायद्यावर तातडीने चर्चा करा, अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत मोदी सरकारला अडचणीत आणण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल या पक्षांनी CAA, NRC, NPR या विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर संसदेत चर्चा होतेय. जामिया मिलियामध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेला गोळीबार, शाहीनबागमधलं आंदोलन त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप खासदार परवेश वर्मा यांच्या वक्तव्यावरही खडाजंगी चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
#NewsAlert – BJP MP Parvesh Verma refers to Rajiv Gandhi as Rajiv Feroze Khan in Lok Sabha. | @Arunima24 with details. pic.twitter.com/0cdllqivPn
— News18 (@CNNnews18) February 3, 2020
भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी लोकसभेत राजीव गांधींचा उल्लेख ‘राजीव फिरोज खान’ असा केल्याने एकच गदारोळ झाला. त्यामुळे ही चर्चा वादळी होईल, असं दिसतंय.सुधारित नागरिकत्व कायदा हे नरेंद्र मोदी सरकारचं मोठं यश आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटलं होतं. यालाही विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, हा कायदा मागे घेतला जाणार नाही, अशीच भाजपची भूमिका आहे. (हेही वाचा : आर्थिक क्षेत्रात अच्छे दिन, मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच सर्वाधिक वाढ) परवेश वर्मा यांनी धार्मिक द्वेष पसरवणारं विधान केल्यामुळे भाजपने त्यांना स्टार कॅम्पेनर्सच्या यादीतून काढून टाकलं होतं. पण हेच परवेश वर्मा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचा ठराव मांडणार आहेत.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विरोधकांच्या बाजूने चर्चेला सुरुवात करतील, अशी शक्यता आहे. राहुल गांधी बोलले नाहीत तर काँग्रेसच्या वतीने शशी थरूर आणि अधीररंजन चौधरी भाषण करतील. ===============================================================================