दंतेवाडा, 19 जानेवारी : छत्तीसगढमध्ये दंतेवाडा इथं अकरावीत शिकणाऱ्या मुलीने हॉस्टेलमध्येच एका मुलाला जन्म दिल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर शाळेसह प्रशासनही हादरलं आहे. याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीने प्रकरण आणखी गंभीर झालं आहे. त्यांनी सांगितलं की, मुलीने जन्म दिलेलं अर्भक मृतावस्थेत होतं. विद्यार्थीनी सध्या रुग्णालयात असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनिला मुल झाल्याचं समजताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी मेडिकल स्टाफशी चर्चा केली आहे. या प्रकरणी तातडीची कारवाई करताना हॉस्टेल सुपरीटेडंटला निलंबित करण्यात आलं आहे. चौकशीनंतर पुढची कारवाई केली जाईल. उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, शाळा प्रशासनाने मृत अर्भक विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडे सोपवलं आहे. तसेच विद्यार्थीनीने गेल्या दोन वर्षांपासून गावातील मुलाशी संबंध असल्याचं सांगितल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं. वाचा : महिला प्रायव्हेट पार्टमध्ये का ठेवतात तंबाखू? डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा दोन दिवसांपुर्वी तब्येत बिघडल्याने विद्यार्थीनीला औषध देण्यात आलं होतं. ताप आल्यावर देण्यात येणारं औषध दिल्याचं समोर आलं आहे. तसेच यानंतर जेव्हा रात्री उशिरा तिची तब्येत बिघडली तेव्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाचा : ब्युटी पार्लरमध्ये सुरू होती शरीर विक्री, पोलिसांनी 11 तरुणींना रंगेहात पकडलं