दुर्गापूर(पश्चिम बंगाल), 19 जानेवारी : ब्युटी पार्लर आणि स्पामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अशाच एका ब्युटी पार्लमध्ये शरीर विक्री व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकला तेव्हा पोलीस तसेच जवळपास राहणारे लोकांना याचा धक्का बसला. पोलिसांनी मोठा सापळा रचून पार्लरवर छापा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी आसनसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी शहर मध्य भागातील ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला. निवासी क्षेत्राच्या ब्युटी पार्लरमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. ही सगळी घटना पश्चिम बंगालमधील दुर्गापूरशी संबंधित आहे. या छाप्याचा एक भाग म्हणून बंगाल अंबुजातील एका खासगी ब्युटी पार्लरमध्ये पोलिसांनी लैंगिक रॅकेटच्या आरोपाखाली 11 महिला आणि एका पुरुषाला रंगेहाथ पकडलं. याशिवाय पोलिसांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. छाप्या दरम्यान शेकडो लोक पार्लरच्या भोवती जमा झाले होते. पोलिसांनी सर्व 11 महिलांना ताब्यात घेतले. छापाच्या कारवाईत एसीपी कंकसा संदीप कारा, महिला पोलीस अधिकारी आणि गुप्तचर विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना ब्यूटी पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळत होती. यानंतर आयुक्तालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांनी अंबुजा परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये छापा टाकला. यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि ग्राहक असल्याचं नाटक केलं. इतर बातम्या - जगातला सर्वात श्रीमंत माणूस भारतात किराणा मालाच्या दुकानात जाऊन विकतोय सामान पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये ग्राहक म्हणून पार्लरमध्ये पहिले दोन पोलिसांना पाठवलं. त्यानंतर, साध्या कपड्यातील पोलीस ब्युटी पार्लरमध्ये त्यांच्या कारवायांची माहिती घेण्यासाठी गेले, त्याचवेळी अधिकाऱ्यांना संशय होताच माहिती मिळाली आणि त्यांनी सगळ्यांना तब्यात घेतलं . काही मिनिटांतच, उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी ब्युटी पार्लरमध्ये प्रवेश केला आणि तपासाची कारवाई सुरू केली. सर्व आरोपींना रांगेमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात पोलिसांनी पार्लर चालवणाऱ्या 11 महिला आणि एका तरूणाला अटक केली आहे. इतर बातम्या - VIDEO: ‘लाज वाटली पाहिजे’ छपाक लूकवर दीपिकाने दिलं TikTok चॅलेंज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.