सेनेगल, 20 जानेवारी : अंमली पदार्थ म्हणून वापरण्यात येणारा तंबाखूचा उपयोग आता सेक्स ड्राइव्हला चालना देण्यासाठी वापरला जात आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, महिला योनीत (गुप्तांग) तंबाखू ठेवून लैंगिक ड्राइव्हला चालना देण्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की सेक्सच्या आवडीमुळे असे करणार्या महिला त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत.
लोक सेक्स ड्राइव्हला चालना देण्यासाठी हा फॉर्म्युला वापर होत आहे. दुसरीकडे, डॉक्टरांनी याबाबत चेतावणी जारी केली आहे. डॉक्टर म्हणतात की, असे केल्याने कायमचं लैंगिक सुख गमावण्याचा धोका आहे. धूम्रपान करणार्या उत्पादनांद्वारे लैंगिक ड्राइव्हला चालना देणे म्हणजे मृत्यूला बोलावण्याकारखं आहे. प्राध्यापक पास्कल फोमेन, 'तंबाखूच्या अल्सर सारख्या आजारांना कारणीभूत ठरतात, जो योनीला संकुचित करून कठोर करते आणि ते कायमचे बंद करू शकते.'
Sci Dev Net च्या अहवालानुसार, तंबाखूचा सामान्य मासिक पाळीवरही परिणाम होतो. मासिक पाळीच्या परिणामामुळे महिलांनाही गर्भधारणा होण्यास त्रास होईल. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अब्दुलाये दीप म्हणतात की, असं करणं म्हणजे योनी संकोचित होण्याचे एक प्रमुख कारण आहे. योनीमध्ये तंबाखू धरणार्या पीडितांना हे समजले असेल की त्यांचे गुप्तांग लहान होत आहे कारण त्यांचे जवळचे स्नायू मागे सरकत असतात.
इतर बातम्या - राजकारणात कही 'पे निगाहे, कही पे निशाणा' ठेवावा लागतो - उद्धव ठाकरे
डॉक्टर दीप म्हणतात की, 'ही भावना क्षणिक आणि गोंधळात टाकणारी आहे. असं करण योनिमार्गाच्या त्वचेसाठी धोकादायक आहे, ज्यामुळे कर्करोग सारख्या प्राणघातक रोगाचा धोका देखील वाढतो. अशी बहुतेक प्रकरणे पश्चिम आफ्रिका देशाच्या सेनेगलमधून समोर आली आहेत. या देशातील बर्याच स्त्रिया लैंगिक सुख मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यासह खेळत आहेत.
सेनेगलमधील लोकांमध्ये असा गैरसमज आहेत की 13 पैशांत मिळणारी तंबाखू तुम्हाला सातवा स्वर्ग दाखवू शकते. हे उत्पादन वाळलेल्या तंबाखूची पाने, झाडाची मुळे आणि वनस्पतींच्या अर्कांकडून बनवण्यात येते. या व्यतिरिक्त सोडा आणि शिया बटर सारख्या पदार्थांना त्यात आणखी प्रभावी बनवण्यासाठी जोडले जाते. अशा सर्व गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानल्या जातात. अशा प्रॅक्टिकलमुळे महिलांच्या आरोग्यास अधिक नुकसान होऊ शकते.
इतर बातम्या - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला भीषण अपघात