JOIN US
मराठी बातम्या / देश / राम रथ यात्रेत अश्लिल डान्सचा शो, नेत्याच्या मांडीवर बसली डान्सर, VIDEO व्हायरल

राम रथ यात्रेत अश्लिल डान्सचा शो, नेत्याच्या मांडीवर बसली डान्सर, VIDEO व्हायरल

सध्या सोशल मीडियाचे युग कधी आहे, काय व्हायरल होईल माहीत याच नेम नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ललितेश कुशवाह (भरतपूर), 07 एप्रिल : सध्या सोशल मीडियाचे युग कधी आहे, काय व्हायरल होईल माहीत याच नेम नाही. असेच एक प्रकरण भरतपूर शहरात नगरपालिकेने आयोजित केलेल्या श्री राम रथयात्रेतून समोर आले आहे. श्रद्धेच्या नावावर महिलांना नाचवत अश्लील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा डान्स पाहून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महिलांनी मंचावर उपस्थित असलेल्या एका नेत्याच्या मांडीवर बसून अश्लिल कृत्य करत असल्याचेही समोर आले आहे.

दरवर्षी श्री रामनवमीच्या दिवसापासून नगरपालिकेच्यावतीने 9 दिवस श्री राम रथयात्रा यात्रा काढण्यात येते.

या रथ यात्रेत अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेतील या कार्यक्रमांमध्ये लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रामवतार मित्तल व इतर नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, काकाचं पुतण्यासोबत धक्कादायक कृत्य

संबंधित बातम्या

लावणीच्या नावाने फिल्मी गाण्यांवर महिला अश्‍लील नाचत असल्याचे पाहून सगळेच अचंबीत झाल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थित महिलांनी यावर नाराजी व्यक्त करत हा कार्यक्रम सोडून गेल्याचे सांगण्यात आले.

या लोकांचे म्हणणे आहे की, प्रभू श्री रामाच्या नावाशी निगडीत असलेल्या या यात्रेत त्यांच्या श्रद्धेच्या नावाखाली अश्लीलता होत आहे. या कार्यक्रमावेळी कोणीही अपेक्षा व्यक्त केली नव्हती.

उमेदवाराला पोत्यात घालून विहिरीत फेकलं; बाजार समिती निवडणुकीआधीच जुन्नरमध्ये खळबळ

यात्रेतील महिला डान्सर्सचे अश्लील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्रपटातील गाण्यांच्या तालावर नाचणारी महिला अश्लील कृत्य करत थेट नेत्याच्या मांडीवर जाऊन बसते. यानंतर तिच्यावर पैसे उधळण्याचा प्रकारही घडला. परंतु सोशल मिडीयावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या