नवी दिल्ली, 18 मे : हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशा इथे चक्रीवादळ ‘अम्फान’ चा इशारा दिला असून पुढील काही तासांत वादळ एक धोकादायक रूप धारण करू शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारपर्यंत पश्चिम बंगालमध्येही हे वादळ पोहोचू शकेल. आयएमडीने म्हटलेल्या निवेदनात, पश्चिम बंगालच्या उपसागरातून मध्य भागात गेल्या 6 तासांत तीव्र चक्रीवादळ ‘अम्फान’ ईशान्य दिशेकडे वाटचाल करत आहे. ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे. हवामान खात्यानं येत्या 6 तासांत चक्रीवादळाचा भयानक प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘अम्फान’ चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता रविवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, ओडिशानं म्हटलं आहे की, या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या 11 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ते तयार आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी नवी दिल्लीत सांगितलं की, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, बंगालच्या उपसागरात ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतर करत आहे आणि येत्या काही तासांत ते एका अत्यंत धोकादायक स्वरुपात असेल. लॉकडाऊननंतरही कोरोनाचा कहर सुरूच, 24 तासांत 157 रुग्णांनी गमावले प्राण
कोलकाता स्थित प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक जी.के. दास यांनी सांगितलं की, चक्रीवादळामुळे उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्हा, कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा आणि हूगली यासह गंगेच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात कित्येक ठिकाणी हलका पाऊस पडला. वेगळ्या ठिकाणी मध्यम पाऊस आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO पश्चिम बंगालमध्ये सैन्याची 7 पथकं तैनात करण्यात आल्या आहेत. हे संघ सहा जिल्ह्यांत आहेत. ओडिशाच्या सात जिल्ह्यात 10 संघटना तैनात करण्यात आल्या आहेत. या जिल्ह्यांमध्ये पुरी, जगतसिंगपूर, केंद्रापाडा, जाजपूर, भद्रक, बालासोर आणि मयूरभंज यांचा समावेश आहे. तर एनडीआरएफच्या पथकात सुमारे 45 कर्मचारी आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने शनिवारी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. एकीकडे कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करावा लागत आहेत तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे लोकांचे नुकसान व जीवितहानी कमी करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. संपादन - रेणुका धायबर