बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO

बापरे! वाऱ्यामुळे रस्त्यावर पार्क केलेली बस मागे-मागे सरकली, तुम्हीच पाहा VIDEO

अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. यामध्ये वाऱ्यामुळे चक्क एक बस मागे-मागे सरकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • Share this:

खम्मम (तेलंगणा), 18 मे : देशभरात कोरोनाचं सावट असताना हवामानातही मोठे बदल झाले आहेत. यात एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे सध्या अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. यामध्ये वाऱ्यामुळे चक्क एक बस मागे-मागे सरकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एखादी गाडी अचानक चालते असं आपण सिनेमात पाहिलं आहे. पण तेलंगाणाच्या खम्मम भागात नागरिकांनी हे लाईव्ह पाहिलं आहे.

खम्मममध्ये सत्तूपल्ली परिसर आहे. इथे एक प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभी. सर्व प्रवासी खाली उतरले होते. बसमध्ये ड्रायव्हरसुद्धा नव्हता. पण हवामानाच्या बदलामुळे मोठ्या वेगाने वारे वाहू लागले. या वाऱ्याचा वेग इतका होती की अगदी बससुद्धा जागेवरून मागे मागे सरकली. ड्रायव्हर नसतानाही बस मागे सरकताना पाहून प्रवाशांना पुरता घाम आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, वाऱ्यामुळे कशा प्रकारे बस मागे सरकत आहे. अखेर बरीच मागे आल्यानंतर ही बस एका झाडाला जोरात आदळली आणि तिथेच थांबली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. अनेक राज्यांत अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.

एककीडे अवकाळी पाऊस तर दुसरीकजे देशावर अम्फान चक्रीवादळाचा देखील धोका आहे. क्रीवादळ अम्फान (Cyclone Amphan) हळुहळू ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर पुढे सरकत आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात हवामानाचा नमुना यापूर्वीच बदलला आहे. रविवारी सायंकाळपासूनच या भागात पाऊस सुरू होईल. 18 ते 20 मे दरम्यान हे वादळ कोणत्याही वेळी कोस्टवर धडकू शकतं. दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 18, 2020, 8:54 AM IST
Tags:

ताज्या बातम्या