JOIN US
मराठी बातम्या / देश / नोटांमुळे कोरोना पसरतो? धास्तावलेल्या दुकानदारांनी मोदी सरकारकडे केली ही मोठी मागणी!

नोटांमुळे कोरोना पसरतो? धास्तावलेल्या दुकानदारांनी मोदी सरकारकडे केली ही मोठी मागणी!

नोटांमुळे व्हायरस पसरतो अशा प्रकारची माहिती पसरल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे तातडीने याबाबत माहिती द्या अशी मागणी होत आहे.

जाहिरात

एखाद्याच्या नशिब कधी आणि कसं पलटेल याचा काही नेम नसतो. असाच एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. अरबी इथं राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या शिक्षिकेचं एका क्षणात आयुष्य बदललं आहे. या शिक्षिकेला रफल ड्रामध्ये चक्क 1 मिलियन अमेरिकी डॉलरचा जॅकपॉट लागला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 5 जून: कोरोना व्हायरसमुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  सरकारने आता सगळे व्यवहार खुले करण्याचा निर्णय घेतल्याने गर्दी वाढत आहेत. लॉकडाऊन नंतर दोन महिन्यांनी आता दुकाने खुली होत असल्याने बाजारातही ग्राहक वाढत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंता निर्माण झाली आहे ती नोटांबद्दल. नोटा या अनेकांच्या हातातून जात असल्याने त्यामुळे संसर्ग होऊ शकतो का? अशी शंका व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे नोटांमुळे व्हायरस पसरतो किंवा काय याबद्दल सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी व्यापारी संघटनांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. या बाबतचं पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पाठविण्यात आलं आहे. नोटांमुळे व्हायरस पसरतो अशा प्रकारची माहिती पसरल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे स्पष्ट करा अशी विनंतीही त्यांनी आरोग्य मंत्रालयाला केली आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं 70 दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यादरम्यान अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले. अनेक कंपन्यांची काम रडखली. काही कंपन्यांनी पगारात कपात केली तर काही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगारही देण्यात आले नाही. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे वाचा -  गडकरींच्या फोननंतर मध्यरात्री चक्र फिरली, 2 वर्षांच्या चिमुकल्याचे वाचले प्राण लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणालाही कामावरून काढू नये आणि पगारात कपात करू नये असं आवाहन केलं असतानाही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं किंवा पगार दिले नाहीत. अशा कंपन्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. लॉकडाऊन दरम्यान कामगारांचे पगार ज्या कंपन्यांनी दिले नसतील त्यांच्याविरुद्ध येत्या 12 जूनपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले आहेत. हेही वाचा -  मोठी बातमी!…तर त्या शासकीय कर्मचाऱ्याचा पगार कपात करावा, सरकारचा नवा आदेश 2.25 कोटींसह पाकिस्तानी तरूणाला अटक, अवैधरित्या विकत होता पान-मसाला आणि तंबाखू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या