2.25 कोटींसह पाकिस्तानी तरूणाला अटक, अवैधरित्या विकत होता पान-मसाला आणि तंबाखू

2.25 कोटींसह पाकिस्तानी तरूणाला अटक, अवैधरित्या विकत होता पान-मसाला आणि तंबाखू

अवैधरित्या पान-मसाला आणि तंबाखू विकणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

इंदूर (मध्य प्रदेश), 05 जून : देशात आधीच कोरोनाच्या संकटाचं थैमान सूरू आहे. अशात पाकिस्तानकडून काही कट रचला जात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. कारण, अवैधरित्या पान-मसाला आणि तंबाखू विकणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो शहरामध्ये अवैधरित्या काम करत होता. जीएसटी इंटेलिजेंसचे महासंचालकाकडून या पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून लाखो रुपयांसह 2.95 कोटींचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जीएसटी इंटेलिजेंस जनरल डायरेक्टरेटच्या भोपाळ युनिटला याबद्दल माहिती मिळाली की, इंदूर शहरात अनेक ठिकाणी नॉन-टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात पान-मसाला आणि तंबाखू लपवून ठेवण्यात आली आहे. आणि याची बेकायदेशीरपणे विक्री केली जात आहे.

या माहितीच्या आधारे, एका टीमने पाच गोदामांवर छापेमारी सुरू केली. त्यामध्ये इंदूरमध्ये असलेल्या काही गोदामांमध्ये पान-मसाला आणि तंबाखूचा मोठ्या प्रमाणात स्टॉक सापडला. हा माल मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर शेजारच्या राज्यांमध्ये पाठवला जात होता.

2.25 कोटींचा पान-मसाला आणि तंबाखू जप्त

छाप्यादरम्यान, 2.25 कोटी रुपयांचा पान-मसाला आणि तंबाखू जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपीकडून 66.47 लाख रोक रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकाची चौकशी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संपादन - रेणुका धायबर

Tags:
First Published: Jun 5, 2020 04:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading