रांची 30 मे: माओवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ३ माओवाद्यांचा खात्मा झाला होता. तर दोन माओवादी जखमी झाले होते. जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांना रक्त देण्याची गरज होती. माणूसकी आणि कर्तव्यभावनेतून CRPFच्या 2 जवानांनी रक्तदान केलं आणि त्यांचा जीव वाचवला. केवळ कर्तव्यभावनेतून आणि माणुसकीच्या नात्यानेच रक्त दिल्याची भावना त्या जवानांनी व्यक्त केली आहे. मनमारू आणि टेबोच्या जंगलाच ही चकमक झाली होती. CRPFची 60 वी बटालीयन आणि पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत 3 माओवादी ठार झाले तर 3 जखमी झाले होते. त्यांना टाटा नगरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना रक्ताची तातडीची गरज होती. त्यावेळी दोन जवानांनी त्यांच्यावर गोळ्या चालविणाऱ्या माओवाद्यांचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रक्त दिल्याने त्या 2 माओवाद्यांचे प्राण वाचले. माओवादी हे सुरक्षा जवांनाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. हे माहित असूनही वर्दीची शिकवण आणि मानवतेची प्रेरणा यातून त्यांनी हे मोठं काम केलं. त्यांच्या या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. **हे वाचा -**कोरोनानंतरचा धक्का सावरण्यासाठी मोदींचा Action Plan, असं असेल शैक्षणिक धोरण! झारखंडमध्ये माओवाद्यांचा जास्त प्रभाव आहे. मोठ्या प्रमाणावर असलेल्या खाणी, जंगल आणि आदिवासींचं प्रमाण जास्त असल्याने माओवादी त्या भागात आपलं प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर खाण मालकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर खंडणही मिळत असते. त्याचा वापर ते शस्त्र खरेदी करण्यासाठी करत असतात. हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, PMOमध्ये केले असे फेरबदल लॉकडाऊनमध्ये जास्त सूट दिल्यास वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती