JOIN US
मराठी बातम्या / देश / ग्रामस्थ अख्खं गावभर शोधतायेत आणि मगर गुपचूप एका घरात घुसली; त्यानंतर असं घडलं की...

ग्रामस्थ अख्खं गावभर शोधतायेत आणि मगर गुपचूप एका घरात घुसली; त्यानंतर असं घडलं की...

नदीतून वाहत आलेलं हे मगरीचं पिल्लू वाट शोधत एका घरात जाऊन बसलं आणि गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली.

जाहिरात

...तेव्हा त्यांच्याच घरात मगर शिरली असल्याचं कळलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुज गौतम, प्रतिनिधी सागर, 02 जुलै : देशाच्या सर्वच राज्यांमध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतात. अशातच अनेक जलचर आणि वन्यजीव बाहेर पडू लागले आहेत. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील हिन्नोद गावात मगर घुसल्याने एकच खळबळ उडाली. गावाशेजारी असलेल्या नदीतून वाहत आलेलं हे 4 फूट लांबीचं मगरीचं पिल्लू वाट शोधत एका घरात जाऊन बसलं आणि गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली. मग गावातीलच एका धाडसी तरुणाने या पिल्लाला पुन्हा नदीत नेऊन सोडलं. तेव्हा कुठे गावकऱ्यांच्या जीवात जीव आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिन्नोद गावात काही दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. अशातच गावात मगर शिरल्याची बातमी पसरली. लोक घाबरून घराबाहेर अंगणात आले. त्यावेळी कमल सिंह नामक व्यक्तीने मगर नेमकी कुठे आहे हे पाहण्यासाठी अख्खा गाव दिसेल या हेतूने आपल्या घराची गच्ची गाठली. त्यानंतर त्यांच्याच घरात मगर शिरली असल्याचं कळलं. तेव्हा त्यांचे कुटुंबीय प्रचंड घाबरले. सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. शिवाय घराशेजारी असलेल्या शाळेतील मुलंही घाबरून वर्गाबाहेर सैरवैर धावू लागली. Viral Memes on Maharashta Politics : होऊ दे व्हायरल! Ajit Pawar यांच्या बंडानंतर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ बऱ्याच गोंधळानंतर गावातील मेहरबान नामक धाडसी तरुणाने कमल सिंह यांच्या घरात जाऊन हे मगरीचं पिल्लू शोधलं आणि त्याला गोणीत भरलं. तिथून त्याने थेट बेतवा नदीचा मार्ग धरला. त्याच्यामागे गावातील लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीही नदीकडे निघाले. नदीवर जाऊन त्याने गोणीतून पिल्लाची सुटका केली. तेव्हा गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या