नवी दिल्ली, 30 एप्रिल : देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या लॉकडाऊनमुळं लोकं आपल्या घरात कैद आहेत. एवढेच नाही तर जवळच्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना जाता येत नाही आहे. तर, काहींच्या अंत्यसंस्काराच्या प्रथा अजूनही बाकी आहे. लॉकडाऊनमुळं लोकांना आपल्या प्रियजनांच्या अस्थींचे विसर्जनही करता येत नाही आहे. सध्या सर्व अस्थी लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. लखनऊच्या अशाच एका स्मशानात शेकडो अस्थी लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. येथील केअटरटेकर अरविंद यांनी न्यूज 18 ला सांगितले की, असा प्रकार पूर्वी कधीच घडला नाही. अरविंद यांनी सांगितले की, ‘हिंदू प्रथेनुसार, अस्थी या गंगा नदीत विसर्जित केल्या जातात. मात्र लॉकडाऊनमुळे आता लोकांना कुठेही जाता येत नाही आहे. सध्या लखनऊ येथील लॉकरमध्ये जवळजवळ 150 ते 200 अस्थी आहेत. वाचा- वडिलांचं आजारपण सांगून लॉकडाऊनमध्ये पडला बाहेर, रुग्णवाहिकेतून घेऊन आला वरात अरविंद म्हणाले की, “अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहांच्या संख्येत घट झाली आहे. या लॉकरखेरीज आमच्याकडे ‘अस्थी कलश’ सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नाही, ज्यांना परवानगी मिळते त्यांना आम्ही अस्थी घेऊन जाण्याची विनंती करतोय. भैसा कुंड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेत एका खासगी कंपनीद्वारे लॉकरची व्यवस्थापित करण्यात आली आहे. वाचा- परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारने अखेर उचलले पाऊल लॉकरबरोबर येथे लाकडी जागाही करण्यात आली आहे. लाकडी स्टोअरच्या बाहेरील पुजारी म्हणाले, “अद्याप य़ेथे एकही शव आलेले नाही आहे, ज्यांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. फक्त एका कोरोना संशयित रुग्णांचे अंत्यसंस्कार येथे झाले”. कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार केल्यानंतर येथील कर्मचाऱ्याना संपूर्ण परिसर सॅनिटाइज करावा लागतो. वाचा- ‘चीन नव्हे अमेरिकेत आहे कोरोनाचा पेशंट झीरो’, चीनच्या दाव्यात किती तथ्य? परदेशातून मृतदेह आणण्यावर बंदी दिशानिर्देशातील पहिल्या मुद्द्यानुसार कोरोना संसर्ग वा संशयित रुग्णांचा मृतदेह भारतात आणणे योग्य नाही, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र अशा परिस्थितीत जर मृतदेह भारतीय एअरपोर्टवर पोहोचला तर संबंधित एअरपोर्टचे आरोग्य अधिकारी दिलेल्या दिशानिर्देशांनुसार तातडीने पावले उचलतील. संबंधित आरोग्य अधिकारी मृत्यू प्रमाणपत्राचा तपास करतील. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळेल. मृतदेह घेऊन जाण्यासाठी भारतीय दूतावासद्वारे दिलेल्या एनओसीचा तपास करण्यात येईल आणि अधिकृत एजंसीद्वारे दिलेल्या प्रमाणपत्राचा तपास करण्यात येईल. संपादन, संकलन-प्रियांका गावडे