JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी! गोध्रा हत्याकांड प्रकरणातील 35 जणांची निर्दोष सुटका; वीस वर्षांनंतर निकाल

मोठी बातमी! गोध्रा हत्याकांड प्रकरणातील 35 जणांची निर्दोष सुटका; वीस वर्षांनंतर निकाल

गोध्रा हत्याकांड प्रकरणातील 35 आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

जाहिरात

35 जणांची निर्दोष सुटका

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गांधीनगर, 18 जून : गोध्रा हत्याकांड प्रकरणातील (Godhra Train Fire Incident) 35 आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील हालोल शहरातील एका न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांच्या न्यायालयानं निकाल देताना गोध्रा हत्याकांड प्रकरणाशी संबंथित चार वेगवेगळ्या प्रकरणातील 35 आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. तसेच या दंगलीला पूर्वनियोजित संबोधल्याबद्दल न्यायालयाकडून प्रसारमाध्यमांवर देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत. नेमकं प्रकरण काय? 28 फेब्रुवारी 2002 रोजी डेरोळ गावातील कलोल बसस्थानक आणि डेरोळ रेल्वे स्टेशन परिसरात हिंसाचार उसळला होता. या प्रकरणात 52 जणांवर हत्या आणि दंगलीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या एक दिवस आधीच साबरमती ट्रेनला आग लागली होती. या प्रकरणात निकाल देताना न्यायालयानं म्हटलं आहे की या खटल्यात आरोपींवर असा आरोप आहे की त्यांनी तीन लोकांची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकले. मात्र आरोपींविरोधात कोणतेही ठोस पुरावे सादर होऊन शकले नसल्यानं त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. 17 आरोपींचा मृत्यू दरम्यान या प्रकरणात 52 लोकांना आरोपी बनवण्यात आलं होतं. मात्र हा खटला प्रदीर्घ काळ चालला या खटल्याची सुनावली तब्बल वीस वर्ष चालली. या कालवधीत या खटल्यातील वीस आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर 35 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या आरोपींवर दंगल घडवून आणल्याचा कोणताही आरोप सिद्ध होत नाही. या दंगलीमध्ये वापरण्यात आलेले शस्त्र न्यायालयासमोर सादर होऊ शकले नाहीत, तसेच आरोपीविरोध इतर कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या